संजय मोरे कुटुंबिय व मित्रपरिवाराचा उपक्रम

लॉकडाऊन काळात अहोरात्र झटणाऱ्या मोहोळ पोलीसांसाठी सॅनिटायझर व नाष्टा वाटप

संजय मोरे कुटुंबिय व मित्रपरिवाराचा उपक्रम

        
वडवळ :     कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं संपूर्ण देश लॉकडाऊन असताना स्वत:ची तसेच स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता आपलं कर्तव्य अहोरात्र चोवीस तास पार पडणाऱ्या पोलीस बांधवांना व या लॉकडाऊनमुळे ज्यांची उपासमार होतेय अश्या गोरगरिबांना रचना हार्डवेअर मोहोळचे मालक संजय मोरे व शुभम (भाईजी) मोरे कुटुंबिय व मित्र परिवाराच्यावतीने सॅनिटायझर, नाष्टा, पाणी बॉटल, बिस्कीट, चहाचे वाटप करण्यात आले. त्यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे अशाच प्रकारे प्रशासनाला समाजातील प्रत्येक घटकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
यावेळी मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, पोलीस नाईक निलेश देशमुख, बंडु मोरे,दिव्य मराठीचे किशोर मारकड,जाधवसर, घाटे सर व इतर सर्व पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
या कार्यासाठी औदुंबर देशमुख, सौरभ मोरे, नरेंद्र गरड, सुरज भोसले, ओम मोरे, गणेश वसेकर, निरंजन केवळे व इतर सर्वांनी  मेहनत घेतली.
Attachments area

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब