बार्शीत ठेकेदाराचा मृत्यू . तपास सीआयडी कडे . पुणे सीआयडी पथक बार्शीत दाखल .

बार्शीत ठेकेदाराचा मृत्यू , तपास सीआयडीकडे 
 पुणे सीआयडी पथक बार्शीत दाखल


बार्शी : आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदी सुरु असताना शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक सहा च्या पाठीमागे सुरु असलेल्या बांधकाम ठेकेदारच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणाचा तपास राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सीआयडी मार्फत होणार असल्याचे आदेश दिले असून तपासाची चक्रे सुरु झाली आहेत . तब्बल तीस तास उलटून गेले तरी अद्याप मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नसून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळालेला नाही .हेमंत पंढरीनाथ नडगिरे ( वय ५४ रा .नागणे प्लॉट ) असे मृत झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे .पोलिसांनी कामगारांना बांधकामावरुन पकडून आणताच कामगारांना भेटण्यास आलेल्या ठेकेदारास पोलिस ठाण्यातच चक्कर आली होती . शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले . घटना शहर पोलिस ठाण्याचे आवारात घडल्याने पंचनामा तहसीलदार प्रतिनिधी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समवेत मंगळवारी रात्री उशीरा अकराच्या दरम्यान पूर्ण झाला .मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला .मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा व तीन डॉक्टरांच्या समवेत करावे अशी नियमावली असल्याने बुधवारी सकाळी मृतदेह सोलापूर येथे नेण्यात आला . सोलापूर येथे शवविच्छेदनापूर्वी कोरोनाची चाचणी घ्यावी लागणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले रात्री नऊ पर्यंत या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने शवविच्छेदन झाले नाही . दरम्यान या घटनेचा तपास अप्पर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सीआयडी कडे देण्याचे आदेश देताच पूणे सीआयडी युनिटचे अधिक्षक निलेश अष्टेकर यांचे समवेत पोलिस निरीक्षक सारिका उबाळे , विद्या गवंडी , रुबी आब्राहम यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज , कागदपत्रे यांची माहिती घेतली .पूढील तपास सोलापूर सीआयडी चे उपअधिक्षक विश्वनाथ राठोड करीत आहेत .

Comments


Popular posts from this blog

पासपोर्ट धारकांनो काळजी घ्या; सायबर विभागानं केलं महत्वाचं आवाहन

पत्नी झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून