मुंबई एअरपोर्टवरुन विमान उड्डाणांची संख्या दुप्पट, आजपासून सुरूवात



मुंबई एअरपोर्टवरुन विमान उड्डाणांची संख्या दुप्पट, आजपासून सुरूवात

मुंबई एअरपोर्टवरून उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या आजपासून दुप्पट...



(संग्रहित छायाचित्र)

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या विमानांची संख्या आजपासून(दि.१६) दुप्पट होत आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी मुंबई विमानतळावरुन दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्यास परवानगी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण विमानसेवा बंद करण्यात आली होती. पण २४ मे रोजी देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये ५० विमाने ये-जा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विमानतळावर आजपासून ५० विमानांचे आगमन व ५० विमानांचे उड्डाण होईल.

मुंबईतून सध्या देशाच्या विविध पंधरा सेक्टरमध्ये देशांतर्गत हवाई प्रवास सुरू आहे. लवकरच त्यामध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे समजते. लॉकडाउन लागू होण्याआधी मुंबई एअरपोर्टवरुन दररोज सुमारे १००० विमानांची (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) वाहतूक व्हायची. तर, आता दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक होईल.

Comments


Popular posts from this blog

बार्शीत ठेकेदाराचा मृत्यू . तपास सीआयडी कडे . पुणे सीआयडी पथक बार्शीत दाखल .

सोलापुरात दमदार पाऊस; शेतांमध्ये साचले पाणी, शेतकरी सुखावला