परराज्यातील 450 कामगारांची प्रशासनातर्फे जेवणाची व्यवस्था

परराज्यातील 450 कामगारांची
प्रशासनातर्फे जेवणाची व्यवस्था
 सोलापूर  : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील सुमारे साडेचारशे कामगारांची निवारा आणि जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. तामिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश येथील विविध कंपनीत काम करणा-या कामगारांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
          त्यांनी सांगितले की, सोलापूर आणि शहर परिसरातील विविध औद्योगीक वसाहतीमध्ये परराज्यातील कामगार नोकरीस आहेत. तामिळनाडू येथील सुमारे दीडशे कामगार जुळे सोलापूर येथील राघवेंद्रनगर येथे राहतात. त्यांना स्वयंसेवी संस्थेमार्फत तयार अन्न व धान्यपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
          वळसंग येथील जीआर इंफ्रा  कंपनीच्या परिसरात राजस्थान आणि मध्यप्रदेशातील सुमारे 175 कामगार वास्तव्यास आहेत. त्यांना कंपनीमार्फत अन्न पुरवठा सुरु करण्यात आला आहे. मंद्रुप येथील आयजी एम कंपनीत राजस्थान येथील 100 कामगार आहेत त्यांनाही कंपनीमार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
          सोलापूर शहरातील सिकची धर्मशाळेलाही निवारा गृह म्हणून जाहीर करण्यात आला आहे. येथेही निराधारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात कोणी निराधार आढळल्यास श्रीमती वैशाली आव्हाड (9158885670) यांच्याशी संपर्क साधावा, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
          राष्ट्रीय महामार्गावरुन जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणा-या वाहनांच्या चालक आणि सहाय्यकांना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भोजन आणि पाणी वितरण करण्यात येत आहे. त्याची ठिकाणे आणि भोजनाची व्यवस्था करणा-या कंपनीचे नाव पुढीलप्रमाणे - 1) एलपीजी प्लॉन्ट एफ 5, चिंचोली एमआयडीसी, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉरपोरेशन 2) सुनिल हॉटेल, चिंचोली एमआयडीसी, सोलापूर, भारत पेट्रोलियम 3) हैदराबाद संगा रेडी रोड, श्री. पुरणमल भगवानचंद माली  4) नांदणी - विजापूर रोड, सिध्देश्वर साखर कारखाना.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब