लॉक डाऊन च्या काळातील गाळा भाडे माफ करा
लॉक डाऊन च्या काळातील गाळा भाडे माफ करा
करमाळा (प्रतिनिधी) कोरणासारख्या महाभयंकर रोगाने देशात थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळातील नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीतील जे छोटेमोटे व्यवसाईक आहेत ज्यांचे कुटुंबाची उदरनिर्वाह ही त्या व्यवसायावर अवलंबून आहे अशा गाळेधारकांची गाळा भाडे व इतर सेवाकर माफ करावे तसेच या कालावधीमध्ये बँका फायनान्स यांनीसुद्धा त्यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे अशी मागणी काँग्रेसचे सुनील बापू सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सावंत म्हणाले की आजच्या काळामध्ये व्यापारी वर्गाला रोज खाणे सुद्धा मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदतीचा हात म्हणून पालिका प्रशासन व बाजार समिती प्रशासनाने गाळा भाडे माफ करून त्यांना मदतीचा हात द्यावा.
Comments
Post a Comment