तुळजापुरात शिवभोजन चालू
तुळजापुरात शिवभोजन चालू
तुळजापूर ( प्रतिनिधी ) : राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेे यांनी सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातल्यामुळे गोरगरिबांची उपासमार होत असल्यामुळे आता पाच रुपयात शिवभजन प्रत्येक ठिकाणी चालू केली आहे. तुळजापूर शहरात दि ३० मार्च सोमवार रोजी जुन्या एसटी स्टँड समोर कोंडो कॉम्प्लेक्स हॉटेल सागर येथे सकाळी अकरा वाजता तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते "शिवभोजनचे" उद्घाटन झाले. यावेळेस कुंदन कोडो,विशाल कोडो,बाळासाहेब कानडे,विनीत कोडो, प्रवीण कानडे, विकी घुगे व कर्मचारी उपस्थित होते. रोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत भोजन चालू राहील असे शिव भोजनचे चालक विशाल कोडो यांनी सांगितले तसेच कोंडो परिवारातर्फे रोज वीस व्यक्तींना मोफत भोजन दिले जाईल.
Comments
Post a Comment