Posts

“मला नेण्यासाठी येऊ शकता का?”, चालता चालता प्राण गमावण्यापूर्वी त्याने कुटुंबाला विचारला शेवटचा प्रश्न

Image
“मला नेण्यासाठी येऊ शकता का?”, चालता चालता प्राण गमावण्यापूर्वी त्याने कुटुंबाला विचारला शेवटचा प्रश्न करोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित झाला आणि अनेक कामगार आपल्या घराच्या दिशेने चालू लागले करोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित झाला आणि अनेक कामगार आपल्या घराच्या दिशेने चालू लागले. वाहतुकीचं कोणतंही साधन उपलब्ध नसल्याने अनेकांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. ३०० ते ५०० किमी अंतर चालत पार करत आपल्या घऱी सुखरुप पोहोचण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. पण यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. ३८ वर्षीय रणवीस सिंह मध्य प्रदेशातील आपल्या घरी पोहोचण्यासाठी चालत निघाले होते. पण रस्त्यातच आग्रा येथे ह्रदयविकाराच झटका आला आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या कुटुंबाशी त्यांचं शेवटचं बोलणं झालं तेव्हा त्यांच्या तोंडी वाक्य होतं, “शक्य असेल तर मला घेऊन जाण्यासाठी या”. रणवीर सिंह आपल्या घरापासून १०० किमी अंतर दूर होते. पण सतत चालण्यामुळे त्यांना थकवा आला होता. यामुळे ते जमिनीवर कोसळले. अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने...

करोनावर या दोन औषधांचे कॉम्बिनेशन प्रभावी: अमेरिकेच्या डॉक्टरचा मोठा दावा

Image
करोनावर या दोन औषधांचे कॉम्बिनेशन प्रभावी: अमेरिकेच्या डॉक्टरचा मोठा दावा SHARE संग्रहित छायाचित्र जगातील अनेक देशांचा आज करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. करोना व्हायरसला रोखू शकणारे प्रभावी औषध बनवण्यासाठी जगातील प्रमुख देशांमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. या दरम्यान अमेरिकेच्या कानसास शहरातील एका डॉक्टरने करोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी औषधांचे एक नवीन कॉम्बिनेशन बनवले आहे. हे औषध करोनावर प्रभावी असल्याचा या डॉक्टरचा दावा आहे. न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे. दोन औषधांचे हे कॉम्बिनेशन प्रत्येक रुग्णावर लागू पडल्यास निश्चित जगासाठी ती एक आनंदाची बाब ठरेल. Covid-19 च्या रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या दोन औषधांचा वापर करत आहेत असे डॉक्टर जेफ कोलयर यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील लेखात म्हटले आहे. एझेड म्हणजे अ‍ॅझीथ्रोमायसीन हे दुसरे औषध आहे. बाजारात हे औषध झेड-पॅक म्हणून ओळखले जाते. Covid-19 च्या १४ रुग्णांना फक्त हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध देण्यात आले. त्यातील सहाव्या दिवशी ५७ टक्क...

कामगारांना भररस्त्यात सॅनिटायझरनी घातली सामूहिक आंघोळ

Image
धक्कादायक: परतलेल्या कामगारांना भररस्त्यात सॅनिटायझरनी घातली सामूहिक आंघोळ करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असल्याने संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर हातावर पोट असणारे कामगार आपआपल्या राज्यांमध्ये पायीच चालत निघाले. हे कष्ट कमी म्हणून की काय आता त्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचे वृत्त समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली शहराच्या सीमेवर परराज्यातून येणाऱ्या कामगारांना रस्त्यावरच गटागटाने सॅनिटायझऱ सोल्युशनने अंघोळ घातली जात आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. परराज्यातून आपल्या राज्यातील शहरांमध्ये आलेल्या कामगारांना रस्त्यावर बसवण्यात आल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील दृष्यांमध्ये दिसत आहे. महिला आणि पुरुष अशा सर्वच कामगारांना रस्त्यावर एकत्र बसवून त्यांच्यावर शहरातील पालिका प्रशासनाचे सफाई कर्मचारी पाईपाने सॅनिटायझर सोल्युशन फवारतात. धक्कादायक बाब म्हणजे या कामगारांबरोबर त्यांच्या सामानावरही हे सॅनिटायझर सोल्युशन मारलं जात आहे. या व्हिडिओमध्ये एक अधिकारी सुरु असणाऱ्या या प्रकरणाचे चित्रिकरण करताना दिसत आहे तर दुसरा अधिकारी...

शरद पवारांमुळं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण

Image
शरद पवारांमुळं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण शरद पवारांमुळं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण मुंबई: देशात करोना व्हायरसचा विळखा वाढताना दिसत आहे. करोनाचा संसर्ग अजून वाढू नये यासाठी दूरदर्शनने एक रामबाण उपाय काढला आहे. ९० च्या दशकात प्रसारित झालेल्या रामायण मालिकेला पुन्हा दाखवण्याचा निर्णय दूरदर्शनने घेतला. २८ मार्चपासून सकाळी ९ ते १० आणि रात्री ९ ते १० या दोन वेळेत रामायण प्रसारित होत आहे. याच पार्श्वभूमीवर  'स्वराज्यरक्षक संभाजी ' मालिका पुन्हा प्रसारित करण्यात येणार आहे. खासदार आणि अभिनेते यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती माहिती प्रेक्षकांना दिली होती. पण या मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचं ही अमोल कोल्हे यांनी शेअर केलं आहे. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. 'आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपण झी ग्रुपसोबत केलेल्या पत्रव्यवहारामुळं महाराष्ट्रात पुन्हा एकदा...

ज्युनियर वकीलांना पाच हजारांची मदत द्या : ॲड मंजुनाथ कक्कळमेली

Image
ज्युनियर वकीलांना पाच हजारांची मदत द्या  : ॲड मंजुनाथ कक्कळमेली सोलापूर (प्रतिनिधी) :   ज्युनिअर वकिलांना पाच हजारांची आर्थिक  मदत द्या अशी मागणी  ॲड मंजुनाथ कक्कळमेली यांनी  एका पत्राद्वारे सरकराकडे केली  आहे  संपूर्ण देशात कोरोनावर नियंत्रण  ठेवण्यासाठी लाँकडाऊनची घोषणा झाली  आहे ,यामुळे भारत सरकार व राज्य सरकार जनतेच्या हालअपेष्ठा कमी व्हावे  यासाठी वेगवेगळे अनुदान  घोषित करीत आहेत परंतु यामध्ये अजून एक वर्ग होरपळून निघत आहे तो म्हणजे  ज्युनिअर वकील वर्ग होय. नुकतेच वकीलीची पदवी घेऊन वकीलीला सुरुवात करणारे ज्युनियर वकीलांची  कोरोना लाँकडाऊनमुळे उपासमार  होत आहे.त्यातच कोरोना मुळे कोर्ट कचेरी बंद असल्याने  वकीली व्यवसायावर परिणाम होत असल्याचे चित्र  दिसून येत आहेत . ज्युनिअर वकिलांची होणारी  उपासमार लक्षात घेऊन ॲड.के. मंजुनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बार काँन्सिल ऑफ इंडिया. आणि  बार का़ँन्सिल ऑफ महाराष्ट्र याना पत्र लिहून ७ वर्षा पेक्षा कमी वकील व्...

नवयुग समाजसेवी संस्था मोहोळच्या वतीने कामगारांना जीवनाश्यक वस्तू वाटप

Image
नवयुग समाजसेवी संस्था मोहोळच्या वतीने   कामगारांना जीवनाश्यक वस्तू  वाटप मोहोळ  :  कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद आहे. या काळात गोर गरीबांचे हाल होवू नये कुणीही अन्नधान्या वाचून अडचणीत येवू नये त्यांचेवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी नवयुग बहुउद्देशिय समाजसेवी संस्था मोहोळच्या वतीने परप्रांतीय मजूर , कामगारांना जीवनाश्यक वस्तू देण्यात येत आहेत.    नवयुग समाजसेवी संस्थेची टिम अध्यक्ष तथा दै.जनसत्यचे रमजान तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव तथा पत्रकार राजन घाडगे, गणेश ढाणके, अनंत तेली, प्रविण गोटे, डॉ. रिजवान शेख, संतोष पोतदार, अंकुश जानकर, प्रशांत झाडे, राजाभाऊ रसाळ, यशोदा कांबळे, रशीदा शेख आदि पदाधिकारी राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू देणेचे मदत कार्य करीत आसताना पहावयास मिळत आहे.  कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे  जीवनावश्यक वस्तूचे दुकाने उघडी असली तरी हाताला काम नसल्याने गोरगरीब...

आ. देशमुख यांनी साधला सरपंच, भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद

Image
आ. देशमुख यांनी साधला सरपंच,  भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद नागरिकांमध्ये कोरोनाबाबत  जनजागृती करण्याचे केले आवाहन  सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पक्षाचे सरपंच आणि भाजप पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क करून त्या त्या भागातील आढावा घेत समस्यांची माहिती घेतली. यावेळी आमदार देशमुख यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे,  असे आवाहन केले. सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे  सावट पसरलेले आहे. सर्व जिल्हावासीय भयभीत झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार  देशमुख यांनी रविवारी सरपंच आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संवाद साधून जनतेला धीर देण्याचे आवाहन केले. याशिवाय  त्या त्या तालुक्यातील परिस्थिती कशी आहे,  याचा आढावा घेतला तसेच या समस्या असतील त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले. या काळात कोणीही औषधाविना आणि अन्नधान्या विना राहू नये याची प्रामुख्याने काळजी घ्यावी असेही यावेळी देशमुख यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे सुधारीत आदेश जारी

Image
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे सुधारीत आदेश जारी सोलापूर  : कोरोना विषाणूबाबत गैरसमज पसरविणारी माहिती कोणत्याही माध्यमातून प्रसारीत केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यानी  दिला आहे. याबाबत त्यांनी काल फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या 144 (1) व (3) नुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत.  या आदेशात नमूद केले आहे की, संचार बंदी कालावधीत  लिखित, डिजीटल  मिडीयामध्ये  छपाई करुन किंवा तोंडी  मजकुर प्रसारीत करेल किंवा चित्र छापेल, ज्यामुळे  लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो, अफवा पसरविल्या जाऊ शकतात अशा कृत्यास बंदी घालण्यात आली आहे.  वरील आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्या विरुध्द संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. 

परराज्यातील 450 कामगारांची प्रशासनातर्फे जेवणाची व्यवस्था

Image
परराज्यातील 450 कामगारांची प्रशासनातर्फे जेवणाची व्यवस्था   सोलापूर  : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील सुमारे साडेचारशे कामगारांची निवारा आणि जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. तामिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश येथील विविध कंपनीत काम करणा-या कामगारांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.           त्यांनी सांगितले की, सोलापूर आणि शहर परिसरातील विविध औद्योगीक वसाहतीमध्ये परराज्यातील कामगार नोकरीस आहेत. तामिळनाडू येथील सुमारे दीडशे कामगार जुळे सोलापूर येथील राघवेंद्रनगर येथे राहतात. त्यांना स्वयंसेवी संस्थेमार्फत तयार अन्न व धान्यपुरवठा सुरु करण्यात आला आहे.           वळसंग येथील जीआर इंफ्रा  कंपनीच्या परिसरात राजस्थान आणि मध्यप्रदेशातील सुमारे 175 कामगार वास्तव्यास आहेत. त्यांना कंपनीमार्फत अन्न पुरवठा सुरु करण्यात आला आहे. मंद्रुप येथील आयजी एम कंपनीत राजस्थान येथील 100 कामगार आहेत त्यांनाही कंपनीमार्फत भोजना...

वुहानमध्ये तीन हजार नव्हे तर ४२ हजारांचा मृत्यू?

Image
वुहानमध्ये तीन हजार नव्हे तर ४२ हजारांचा मृत्यू? बीजिंग:   करोना व्हायरस  संसर्गाचे केंद्र असणाऱ्या वुहानमध्ये कितीजणांचा मृत्यू झाला आहे, याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ हजारजणांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. चीन सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, वुहानमध्ये करोनाच्या संसर्गाने जवळपास ३२०० जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत, डेली मेलने स्थानिकांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. चीनच्या हुबेई प्रातांची राजधानी असणाऱ्या वुहान शहरातील बाजारपेठेतून सुरू झालेल्या  करोना  व्हायरसच्या संसर्गाने संपूर्ण चीनमध्ये ३३०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८१ हजारजणांना संसर्ग झाला आहे. यामध्ये ३१८२ जणांचा मृत्यू हुबेई प्रांतात झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिदिन ५०० जणांचा अस्थि कलश मृतांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येत आहे. वेगवेगळ्या सात स्मशानभूमी स्थळावरून अस्थिकलश सोपवण्यात येत आहेत. त्यानुसार मागील २४ तासांत ३५०० जणांचे अस्थिकलश त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. हंक...

संजय मोरे कुटुंबिय व मित्रपरिवाराचा उपक्रम

Image
लॉकडाऊन काळात अहोरात्र झटणाऱ्या मोहोळ पोलीसांसाठी सॅनिटायझर व नाष्टा वाटप संजय मोरे कुटुंबिय व मित्रपरिवाराचा उपक्रम          वडवळ :     कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं संपूर्ण देश लॉकडाऊन असताना स्वत:ची तसेच स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता आपलं कर्तव्य अहोरात्र चोवीस तास पार पडणाऱ्या पोलीस बांधवांना व या लॉकडाऊनमुळे ज्यांची उपासमार होतेय अश्या गोरगरिबांना रचना हार्डवेअर मोहोळचे मालक संजय मोरे व शुभम (भाईजी) मोरे कुटुंबिय व मित्र परिवाराच्यावतीने सॅनिटायझर, नाष्टा, पाणी बॉटल, बिस्कीट, चहाचे वाटप करण्यात आले. त्यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे अशाच प्रकारे प्रशासनाला समाजातील प्रत्येक घटकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यावेळी मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, पोलीस नाईक निलेश देशमुख, बंडु मोरे,दिव्य मराठीचे किशोर मारकड,जाधवसर, घाटे सर व इतर सर्व पोलीस अधिकारीही उपस्थित होते. या कार्यासाठी औदुंबर देशमुख, सौरभ मोरे, नरेंद्र गरड, सुरज भोसले, ओम मोरे, गणेश वसेकर, निरंजन केवळे व इतर सर्वांन...

लॉक डाऊन च्या काळातील गाळा भाडे माफ करा

Image
लॉक डाऊन च्या काळातील गाळा भाडे माफ करा करमाळा (प्रतिनिधी)   कोरणासारख्या महाभयंकर रोगाने देशात थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळातील नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समितीतील जे छोटेमोटे व्यवसाईक आहेत ज्यांचे कुटुंबाची उदरनिर्वाह ही त्या व्यवसायावर अवलंबून आहे अशा गाळेधारकांची गाळा भाडे व इतर सेवाकर  माफ करावे तसेच या कालावधीमध्ये बँका फायनान्स यांनीसुद्धा त्यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे अशी मागणी काँग्रेसचे सुनील बापू सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सावंत म्हणाले की आजच्या काळामध्ये व्यापारी वर्गाला रोज खाणे सुद्धा मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदतीचा हात म्हणून पालिका प्रशासन व बाजार समिती प्रशासनाने गाळा भाडे माफ करून त्यांना मदतीचा हात द्यावा.

मोहोळ शहरांमध्ये स्वखर्चाने औषध फवारणी

Image
नगरसेवक प्रमोद डोके व नगरसेवक सत्यवान देशमुख यांच्या वतीने मोहोळ  शहरांमध्ये स्वखर्चाने औषध फवारणी एक एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन मोहोळ,(तालुका प्रतिनिधी): मोहोळ शहरांमधील नगरसेवक असणारे प्रमोद डोके व सत्यवान देशमुख यांच्या मार्फ़त विविध सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवले जातात.यावेळीकोरोना च्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर परिषदेचे गटनेते प्रमोद डोके व शिवसेनेचे नगरसेवक सत्यवान देशमुख यांच्यावतीने औषध फवारणी करण्यात आली.कोरोना विषाणूच्या फैलावणे संपूर्ण देश हादरून गेला आहे,या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य विभाग,गृहविभाग अन्य यंत्रणा हा महाभयंकर कोरोना विषाणू आपल्या राज्यातून हद्दपार घालवण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असताना हे एकट्या शासनाचे काम नसून भयभीत झालेल्या मोहोळ शहरातील नागरिकांना धीर देण्यासाठी या कोरोना विषाणू विरोधात आपणही लढाई लढली पाहिजे आणि ते आपल्या गावासाठी कर्तव्य ही आहे म्हणून नगरसेवक प्रमोद डोके तसेच नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी ब्लोअर मशीन ने संपूर्ण मोहोळ शहरा मधून औषध फवारनी केली.यामध्...

विरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचार्‍यांना मास्क वाटप

Image
विरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचार्‍यांना मास्क वाटप नागरिकांनी योग्य ती काळजी घ्या -नवनाथ अवताडे मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):  विरवडे बु.(ता.मोहोळ) येथे ग्रामपंचायत च्या वतीनेनागरीकामध्ये मिसळून कोरोना संसर्गाच्या बाबतीत महत्वाच्या कामाची जबाबदारी पार पाडणारे आरोग्य सेविका,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका यांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. विरवडे बू ग्रामपंचायत च्या वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर  विविध खबरदारी घेण्यात येत असून पुणे - मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या आणि कोरोना मुळे जी लोक गावात रहायला आली आहेत, त्यांनी बाहेर फिरु नये, इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने त्यांची घरोघरी जाऊन आरोग्याची विचारपुस करून नोटीस देण्यात आली. तसेच तपासण्यासाठी जाण्यासाठी आग्रह धरण्यात आला. यावेळी ग्रामसेविका काळे मॅडम,सरपंच प्रभुराम अवताडे, उपसरपंच दिनकर बापु पवार, गावकामगार तलाठी राठोड,पोलिस पाटील वसंत पाटील,नवनाथ अवताडे,श्रीधर पाटील,प्रमोद अवताडे,आण्णा कांबळे,मनोज कांबळे आदि उपस्थित होते. ......................................................

भाजी मार्केट सह प्रा .आ .केंद्रात सोशल डिस्टन्स ची काळजी ...

Image
भाजी मार्केट सह  प्रा .आ .केंद्रात सोशल डिस्टन्स ची काळजी वैराग  (प्रतिनिधी) :   कोरोना विषाणूचा विळखा हळूहळू वाढत असताना प्रशासनाने केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत कोरोना ला हरवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करत असताना दोन दोन रुग्णांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्याची काळजी प्राथमिक आरोग्य केंद्राने घेतली जात असून भाजी मार्केट मध्ये सुद्धा पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्स पाळला जात आहे.           एकीकडे महाराष्ट्रासह देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. ग्रामीण भागात या विषाणूने पाय पसरू नयेत म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दोन व्यक्तींमधील अंतर कमीत कमी तीन फूट असावे याच प्रशासनाच्या आदेशाला हो देत वैराग मधील प्राथमिक केंद्रात येणाऱ्या दोन रुग्णांन मध्ये योग्य ते अंतर ठेवण्यात येत आहे .तसेच पहिल्या दोन दिवशी भाजी खरेदीसाठी झालेली नागरिकांची झुंबड पाहता वैराग पोलिसांच्यावतीने भाजी विक्रेत्यांना योग्य ती मार्गदर्शक तत्त्वे सांगून ...

प्रशासन झाले खडबडून जागे

Image
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या मागणीने प्रशासन  झाले खडबडून जागे माळीनग र(प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील ज्या रुग्णालयाने विभागीय आयुक्त पुणे,व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून रुग्णालये बंद ठेवली आहेत,त्या रुग्णालयाचे चालक यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांची नोंदणी कायमची रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना   दिनांक २८/३/२०२ रोजी दिले होते.त्यामुळे माळशिरस तालुक्यातील प्रशासन खडबडून जागे झाले. देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्याने सर्वसामान्य माणूस घरामध्येच बसून असताना या सर्वसामान्य माणसाला कोरोना ची लक्षणे सोडून इतर आजारासाठी दवाखान्यात जाणे आवश्यक आहे,मात्र माळशिरस तालुक्यातील सर्व खेड्या गावातील,शहरातील खाजगी दवाखाने बंद करण्यात आले आहेत असे निवेदनात म्हटले होते. त्याच मागणीला अनुसरून दिनांक२९/३/२०२० माळशिरस तहसीलदार यांनी प्रत्येक गावातील ग्रामस्तरीय समितीला त्यांच्या...

तुळजापुरात शिवभोजन चालू

Image
तुळजापुरात शिवभोजन चालू तुळजापूर  ( प्रतिनिधी ) : राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेे यांनी सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातल्यामुळे गोरगरिबांची उपासमार होत असल्यामुळे आता पाच रुपयात शिवभजन प्रत्येक ठिकाणी चालू केली आहे. तुळजापूर शहरात दि ३० मार्च सोमवार रोजी जुन्या एसटी स्टँड समोर कोंडो कॉम्प्लेक्स हॉटेल सागर येथे सकाळी अकरा वाजता तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते "शिवभोजनचे" उद्घाटन झाले. यावेळेस कुंदन कोडो,विशाल कोडो,बाळासाहेब कानडे,विनीत कोडो, प्रवीण कानडे, विकी घुगे व कर्मचारी उपस्थित होते. रोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत भोजन चालू राहील असे शिव भोजनचे चालक विशाल कोडो यांनी सांगितले तसेच कोंडो परिवारातर्फे रोज वीस व्यक्तींना मोफत भोजन दिले जाईल.

संचारबंदीच्या कालावधीत नागरीकांनी घराबाहेर पडू नये

Image
संचारबंदीच्या कालावधीत नागरीकांनी घराबाहेर पडू नये                                 उपविभागीय पोलीस अधिकारी- डॉ.सागर कवडे   पंढरीत संचारबंदीचे उल्लंघन:29 जणांवर कारवाई  पंढरपूर  : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  संचार बंदी  लागू करण्यात आली आहे. नागरीकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रशासन प्रशासन सज्ज्‍ आहे. नागरीकांनी  अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी केले आहे. संचारबंदी लागू असताना देखील काही नागरीक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मात्र नागरीकांकडून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.  पंढरपूरातील  ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत विविध भागात नागरीक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता  29 नागरीकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माह...

पोलिसांवर केली जमावांनी दगडफेक

Image
अतिउत्साह तरुणांनी मोडला जमावबंदीचा आदेश;  पोलिसांवर केली जमावांनी दगडफेक अक्कलकोट शहर प्रतिनिधी :  वागदरी येथील श्री परमेश्वर रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय झाला असताना काही अतिउत्साही तरूणांनी नियम डावलून आज रविवारी रथोत्सव काढला. याचदरम्यान पोलिसावर दगडफेक केल्यामुळे वागदरी येथील वातावरण तणावपूर्ण आहे. रात्री उशिरा पर्यंत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वागदरी (ता.अक्कलकोट) येथील परमेश्वर यात्रा २५ मार्च रोजी होती. देशात कोरोनो आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे जमावबंदीचा आदेश असल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. परंपरेप्रमाणे पंच कमिटीच्या वतीने दोघांनी आज शनिवारी पूजा करण्याचे ठरले होते. पूजा चालू असताना जवळपास शंभर अतिउत्साही तरूण जमा होऊन त्यांनी रथ ओडण्यास प्रारंभ केला. संचारबंदी असताना जमाव जमा झाल्याने पोलिसानी रथयाञा रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी रथ रोखल्याने चिडलेल्या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेतले.

सानिया र.शेख यांने काढलेले चित्र

Image