Posts

रात्रीत आढळले सोलापुरात 74 पॉझिटिव्ह रुग्ण

Image
 रात्रीत आढळले सोलापुरात 74  पॉझिटिव्ह रुग्ण  सोलापूर  : सोलापूर शहर व जिल्ह्यात 15 तासांमध्ये तब्बल नवीन 74 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  आज सकाळी आठ वाजेपर्यंत नव्याने आढळलेल्या 74 व्यक्तींमध्ये 60 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत 166 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 74 पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापुरात आतापर्यंत कोरोनामुळे 72 जणांचा मृत्यू झाला असून 321 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सहा हजार 594 व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून पाच हजार 772 एवढे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 822 झाली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात येणार कसा? हा प्रश्न सर्वांसमोर पडला असून सोलापूर शहरातील कोरोना आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊ लागला आहे. अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळू लागल्याने सोलापुरातील कोरोनाबद्दल चि...

जामगाव येथील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह

Image
 जामगाव येथील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह सोलापूर  :   शुक्रवारी सकाळी सोलापूर प्रशासनाकडून स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला असून जामगाव येथील त्या वृद्धाच्या संपर्कातील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून सात अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जामगाव (आ) (ता. बार्शी) येथे कोरोना बाधित रुग्णावर सोलापूर येथे उपचार सूरु असताना त्याचा मृत्यू झाला असून त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले तीन जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार प्रदिप शेलार यांनी दिली जामगाव येथील वृद्ध रुग्ण मुंबई येथून मूलीच्या घरी ता. 16 रोजी आला होता. त्याच्यावर गावातील एका बोगस डॉक्‍टरने उपचार करुन दोन सलाईन लावली होते. सर्दी, खोकला, ताप जाणवत असताना पुन्हा ता. 21 जुलाब व अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला होता. बार्शीतील तीन खासगी रुग्णालयात त्या वद्धाचा जावई घेऊन गेला. मात्र रुग्णालयांनी त्यांना दाखल करुन घेतले नाही. अखेर एका रिक्षाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्‍टरांना त्या वृद्धामध्ये कोरोनाचा संशय येताच सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दरम्यान, प्...

सोलापूरकर चिंतेत...गुरुवारी नवीन ८१ रुग्ण ; रुग्णांची संख्या एकूण ७४८ ;एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू

Image
सोलापूरकर चिंतेत... गुरुवारी नवीन ८१ रुग्ण ; रुग्णांची संख्या एकूण ७४८ एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू   सोलापूर ( प्रतिनिधी)  : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाने एन्ट्री केल्यापासून सर्वाधिक 81 कोरोना बाधित रुग्ण आज एकाच दिवशी आढळले आहेत. आज आढळलेल्या 81 रुग्णामुळे सोलापुरातील एकूण रुग्णांची संख्या 748 झाली आहे. आज एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे सोलापुरात आत्तापर्यंत कोरोनाने  72 जणांचा बळी घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या सहा जणांना आज दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे. बार्शी तालुक्यातील जामगाव परिसरातील 66 वर्षीय पुरुषाला 25 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले होते. 27 मे रोजी रात्री अकरा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जुना विडी घरकुल परिसरातील 61 वर्षीय महिलेला 24 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 27 मे रोजी उपचारा दरम्यान रात्री अकरा वाजता त्यांचे निधन झाले आहे. बेगम पेठ किडवाई चौक परिसरातील 57 वर्षीय महिलेला 26 मे रोजी सायंकाळी दुपारी चार ...

महापालिका आरोग्य विभागास चार "खाट" भेट ; "श्रीमंतयोगी प्रतिष्ठान" ने जपली बांधिलकी

महापालिका आरोग्य विभागास चार "खाट" भेट   आपत्ती काळात "श्रीमंतयोगी प्रतिष्ठान" ने जपली बांधिलकी  सोलापूर:  शहरात वरचेवर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे उपचारासाठी  दवाखान्यांमध्ये अनंत अडचणी आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासत महापालिका आरोग्य विभागास चार खाट भेट दिले आहेत. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेकडे अधिक साधन सामग्री असावी या प्रमुख उद्देशातून प्रतिष्ठाने महापालिका आरोग्य विभागास चार खाट भेट दिले आहेत. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महापालिकेचे उपायुक्त अजयसिंह पवार, जिल्हा परिषदेचे वित्त विभागाचे संचालक धनराज पांडे, राजधानी एक्सपोर्टचे राहुल चंडक, युसुफ मुंजावर, श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेस चार खाट प्रदान करण्यात आले.श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त या महामारीच्या पार्श्वभूमीवर चार खाट देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे....

मोहोळ शहरातील मास्क न वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

Image
मोहोळ शहरातील मास्क न वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई मोहोळ तालुका प्रतिनिधी:  कोविड १९ च्या काळात मोहोळ शहरातील दुकानदार, फळ विक्रेते भाजीविक्रेते मास्क वापरत नसल्याने मोहोळ नगर परिषदेच्या पथकाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. गुरुवारी दिवसभर एकूण बत्तीस जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३४०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी २४ मे रोजी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्या साठी उपाययोजना करण्याचे आदेश मोहोळ नगर परिषदेला दिले होते. त्यानुसार मोहोळ नगरपरिषदेने पोलिस प्रशासनाच्या मदतीने एक पथक तयार केले होते. या पथकाने  संपूर्ण शहरात पेट्रोलिंग केले असता दुकानदार, फळविक्रेते, भाजीविक्रेते असे एकूण ३२ लोक मास्क न वापरता विक्री करत असल्याचे आढळले. त्यामुळे सदर लोकांवर नगरपरिषदेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ३४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकामध्ये मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर,...

पेट्रोलियम कंपन्यांचं ठरलं; पुढील आठवड्यात ग्राहकांना दे धक्का!

Image
पेट्रोलियम कंपन्यांचं ठरलं; पुढील आठवड्यात ग्राहकांना दे धक्का! पेट्रोल पंप नवी दिल्ली :  करोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद करण्यात आला होता. मात्र जूनपासून लॉकडाउन शिथिल झाल्यास पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. तसे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लीटरमागे ४ ते ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात इंधन दरवाढीचा शॉक ग्राहकांना बसणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची नुकताच एक बैठक पार पडली. करोना आणि लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यात जूनपासून दैनंदिन दर आढावा घेण्याचे मान्य करण्यात आले. त्यानुसार जर देशात लॉकडाउनचा कालावधी वाढवला पण केंद्र सरकारने परवानगी दिली तर कंपन्यांनी दररोज पेट्रोल आणि डिझेल दराचा आढावा घेण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या महिनाभरात ५० टक्के वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच...

पॅकेज जाहीर करू नका, असं पंतप्रधानांनीच सांगितलं -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
पॅकेज जाहीर करू नका, असं पंतप्रधानांनीच सांगितलं -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा करताना उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र) राज्यात करोनाचं संकट उभं आहे. राज्य सरकार सर्वोतोपरी करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडं राज्य सरकारनं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाकडून केली जात आहे. पॅकेज जाहीर करण्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. पॅकेज जाहीर करण्यामागील कारणांचा उहापोह ही त्यांनी गुरूवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्वांगीण परिस्थितीवर भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले,”पुढील १०-१५ दिवस काळजीचे आहेत. राज्यातील आणि मुंबईतील रुग्णांची संख्या शिखरावर असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. ...

नवीन मोबाईल घेण्यावरुन पतीशी भांडण, विवाहितेची आत्महत्या

Image
नवीन मोबाईल घेण्यावरुन पतीशी भांडण, विवाहितेची आत्महत्या मुलांना ऑनलाईन कोचिंगसाठी नवीन मोबाईल घेऊन देण्यावरुन पतीशी झालेल्या भांडणामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत घडली आहे. ज्योती मिश्रा असं या महिलेचं नाव असून बुधवारी तिने स्वतःवर केरोसिन ओतून घेत पेटवून दिलं. या अपघातात ज्योती ९० टक्के भाजली होती, अखेरीस गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान ज्योतीने अखेरचा श्वास घेतला. आपल्या मुलांच्या ऑनलाईन कोचिंगसाठी नवीन मोबाईल घ्या यासाठी ज्योती आणि तिचा पती प्रमोद मिश्रा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. प्रमोदने आपल्या पत्नीला थोडे दिवस वाट पाहण्याची विनंती केली. बुधवारी याच मुद्द्यावरुन ज्योती आणि प्रमोद यांच्यात भांडणं झालं, ज्यावरुन रागावलेल्या ज्योतीने स्वतःवर केरोसिन ओतून घेत पेटवून दिलं. यानंतर प्रमोदने शेजारच्यांच्या मदतीने आपल्या पत्नीला सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. मात्र गुरुवारी सकाळी ज्योतीने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांना दिलेल्या जबानीत ज्योतीने, पतीशी झालेल्या भांडणामुळे आपण हे कृत्य केल्याचं सांगतिलं. सात वर्षांपूर्वी ज्योती आणि प्रमोद यांचं ...

उपासमारीमुळे महिलेचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू, बाळाची मात्र आईला उठवण्यासाठी केविलवाणी धडपड

Image
उपासमारीमुळे महिलेचा रेल्वे स्थानकावरच मृत्यू, बाळाची मात्र आईला उठवण्यासाठी केविलवाणी धडपड रेल्वे स्थानकावरावरील हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल व्हिडिओ लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांना अनेक संकटांचा समाना करावा लागत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडिओ बिहारमधील एका रेल्वे स्थानकावरील आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा प्लॅटफॉर्मवर पडलेल्या आपल्या आईच्या मृतदेहावरील चादर खेचून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतानाच दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या घटनेसंदर्भात हळहळ व्यक्त केली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेचा मृतदेह रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पडल्याचे दिसून येत आहे. या मृतदेहावरील चादर खेचून या महिलेचा लहान मुलगा तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुलगा तिच्या अंगावर चादर खेचून काढतो मात्र त्या महिलेकडून काहीच प्रतिसाद त्याला मिळत नाही. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांनी हा व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याचे सांगण्या...

बाप रेल्वे स्थानकात दूध शोधत असताना चिमुकल्यानं सोडला जीव

Image
बाप रेल्वे स्थानकात दूध शोधत असताना चिमुकल्यानं सोडला जीव श्रमिक मजुराच्या मुलाच्या दुर्देवी अंत (प्रातिनिधिक फोटो) दिल्लीहून बिहारला आलेल्या श्रमिक मजुराच्या साडेचार वर्षाच्या मुलाचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. दिल्लीहून श्रमिक विशेष ट्रेनने बिहारमधील मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात घडला आहे. मुलाला भूक लागली असल्याने वडील रेल्वे स्थानकामध्ये दूध मिळतय का शोधत असतानाच या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. दिल्लीमधील झोपडपट्टीमध्ये राहणारा मसूद आलम हा मूळचा पश्चिम चंपारण जिह्ल्यातला. मागील अनेक वर्षांपासून तो दिल्लीमध्ये रंगकाम करण्याचं काम करत होता. पत्नी झेबा आणि मुलगा इश्क असे मसूदचे त्रिकोणी कुटुंब होतं. मात्र लॉकडाउन सुरु झाल्यानंतर सर्व काम ठप्प झाल्याने मसूदच्या कुटुंबावर आर्थिक संकट आलं. एका मागून एक दिवस लॉकडाउन वाढत असल्याने साठवून ठेवलेले पैसेही संपल्याने मसूदने कुटुंबासहीत आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. झोपडपट्टीमधील भाड्याच्या घरात राहणाऱ्या मसूदने डिपॉझीटही न घेता दिल्ली सोडण्...

सध्या तरी शाळा सुरु करणं अवघड : उद्धव ठाकरे

Image
सध्या तरी शाळा सुरु करणं अवघड – उद्धव ठाकरे ऑनलाइन शिक्षण सुरु करण्याचा उद्धव ठाकरेंचा विचार लॉकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरु होणार की नाही ? याबाबत पालकांच्या मनात संभ्रम आहे. याबाबत स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा लगेच पुन्हा सुरु करणं सध्यातरी अवघड दिसत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी शाळेच्या प्रश्नावर बोलताना सांगितलं की, “शहरातील शाळा सुरु कराव्यात का असा प्रश्न आहे. मी ज्या शाळेत शिकलो तिथे एका बाकावर दोन विद्यार्थी बसायचे. सध्याही अनेक ठिकाणी असंच सुरु आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु कसं करायचं यावर विचार सुरु आहे. ऑनलाइन पद्धतीने, एखादा चॅनेल घेऊन, मोबाइल कंपन्यांशी बोलून अधिक डेटा देतील येईल का ? अशा अनेक गोष्टींचा विचार सुरु आहे”. “काही जणांचं म्हणणं होतं ग्रीन झोनमधील शाळा सुरु करा. पण अशा अर्धवट प...

सोलापूर शहर व जिल्ह्यात42 कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, एकूण बाधित 709

Image
सोलापूर शहर व जिल्ह्यात42 कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, एकूण बाधित 709 सोलापूर :   आज गुरुवारी सकाळी 8 या 15 तासांमध्ये तब्बल 42 नवीन रुग्ण आढळले आहेत. या नवीन  रुग्णांमध्ये  17 पुरुष व 25 महिलांचा समावेश आहे. एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यूही आज सकाळी आठ वाजेपर्यंत झाला आहे. कोरोनामुळे सोलापुरातील मृत पावलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 67 झाली आहे. सोलापुरातील सहा हजार 289 जणांची  आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 5,580 आले आहेत. 709 पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या 311 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही संख्या कधी आटोक्यात येणार? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. 12 एप्रिल पर्यंत कोरोना मुक्त असलेले सोलापूर अचानक कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस विभाग सोलापुरातील कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. दैनंदिन वाढत चाललेल्या रुग्णसंख्या संख्येमुळे सोलापूरमध्ये संभ्रमाचे व भितीचे वातावरण पसरले आहे

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला

Image
 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एक  कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला  सोलापूर :  सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तत्पूर्वी, तो 20 मेपासून रजेवरच होता आणि निमोनिया झाल्याने त्याला केगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. मात्र, त्याच्यावर उपचार होत नसल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितल्यानंतर तेथील अधिकाऱ्याला तुरुंग अधीक्षकांनी लेखी पत्र दिले. 24 मे रोजी त्याला कुंभारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (ता. 27) त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार म्हणजे संशोधनाचा आहे, असे तुरुंग अधिक्षक डी. एस. इगवे म्हणाले. जिल्हा कारागृहात काम करणारा तो कर्मचारी त्याच्या आईसोबत शासकीय क्वार्टरमध्ये राहतो. तर त्याची पत्नी व मुले पुण्यात आहेत. तो 22 तारखेपासून रजेवर होता. त्याला निमोनीया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला क्वारंटाईन करण्यात आले. त्या कर्मचार्‍यावर उपचार करावेत, असे पत्र दिल्यानंतर त्याला नेण्यात आले. यापूर्वीही जिल्हा कारागृहातील एका कैद्य...

अक्कलकोट शहरात तीन,कुंभारीत दोन, सांगोल्यात एक कोरोना बाधित

Image
    अक्कलकोट शहरात तीन,कुंभारीत दोन, सांगोल्यात एक कोरोना बाधित सोलापूर :   कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आज सकाळी  नव्याने आढळलेल्या  42 कोरोना बाधित रुग्णांमध्ये  अक्कलकोट शहरातील तीन, सांगोला तालुक्यातील निजामपूर येथील एक आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विडी घरकुल मधील  दोन रुग्णांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूरच्या प्रांताधिकारी  ज्योती पाटील  म्हणाल्या,  अक्कलकोट शहरामध्ये आज नव्याने तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून  या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या  व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यापाऱ्यांच्या संपर्कातील हे तीन जण आहेत. कुंभारी मधील विडी घरकुल येथील  दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. सांगोला तालुक्यातील  निजामपूर  गावातील एक व्यक्ती  कोरोनाबाधित आढळला असून  हा परिसर  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची कार्यवाही  सुरू असल्याची माहिती  सांगोल्याचे प्रांता...

दारु पिण्यासाठी महापौरानेच तोडला लॉकडाउनचा नियम; पोलिसांपासून वाचण्यासाठी शवपेटीत झोपला

Image
दारु पिण्यासाठी महापौरानेच तोडला लॉकडाउनचा नियम; पोलिसांपासून वाचण्यासाठी शवपेटीत झोपला पेरु देशामधील एका शहरातील महापौरानेच सरकारने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनदरम्यान घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले. हा महापौर नियम मोडून आपल्या घराबाहेर पडला. मात्र पोलिसांना पाहताच आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून या व्यक्तीने चक्क शवपेटीमध्ये उडी मारत मृत असल्याचा अभिनय केल्याचे समजते. यासंदर्भातील वृत्त इव्हिनिंग स्टॅडर्ट या वेबसाईटने दिलं आहे. या महापौराचे नाव जॅमी रोनाल्डो उर्बीना टॉरेस असं आहे. इंटरनेटवर सध्या शवपेटीमध्ये झोपलेल्या जॅमी यांचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी ट्विटवरुन तो शेअर केला आहे. या महापौराने आपल्या मित्रांबरोबर मद्यप्राशन करण्यासाठी लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केलं. या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस या लोकांवर कारवाई करण्यासाठी गेले असताना जॅमीने शवपेटीत झोपला तर त्याचे मित्र कपाटामागे लपवले. तंतारा शहरामधील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापौरावर सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी जॅमी आणि त्याच...

फक्त दोनशे रुपयात करोनाची चाचणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट; ‘सीएसआयआर’चा रिलायन्ससोबत करार

Image
फक्त दोनशे रुपयात करोनाची चाचणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट; ‘सीएसआयआर’चा रिलायन्ससोबत करार देशात करोनाचा प्रसार अजूनही थांबल्याची चिन्ह नाहीत. दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये करोनाचा प्रसार होतच असून, चाचणी करणं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं नाही. करोनाच्या चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये ४५०० शुल्क आकारलं जातं. मात्र, आता लवकरच कमी पैशात करोनाचं निदान करणं शक्य होणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) रिलायन्सच्या मदतीनं करोनाचं निदान करणारी किट विकसित करणार आहे. यासाठी दोघांमध्ये करारही झाला आहे. करोनाचं निदान करणाऱ्या आरटी-लॅम्प कोविड-१९ टेस्ट किटविषयी (Reverse Transcriptase- loop Mediated Isothermal Amplification)परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी ‘एएनआय’ला माहिती दिली. “कोविड-१९ आरटी-लॅम्प चाचणी न्युक्लिक अॅसिड आधारित आहे. रुग्णांच्या घशातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचं प्रात्यक्षिकही यशस्वीरित्या झालं आहे,” असं मांडे यांनी सांगितलं. “आरटी-लॅम्प टेस्ट ही खूप स्वस्त आ...

सोलापुरात बुधवारी ४३ नवे रुग्ण ; ३ जणांचा मृत्यू तर रुग्णाची संख्या ६६७ वर

Image
सोलापुरात बुधवारी ४३ नवे रुग्ण ; ३ जणांचा मृत्यू तर रुग्णाची संख्या ६६७ वर    सोलापूर (प्रतिनिधी) आज रात्री 9 वाजता सोलापूरातील कोरोनाची ताजी स्थिती प्रशासनानं प्रसिध्द केली आहे. यानुसार आज 43 नवे पॉझिटिव्ह रूग्ण सोलापूरात आढळून आले आहेत. एकूण पॉझिटिव्ह संख्या 667 असून 311 जण बरे झाले आहेत तर मृतांची संख्या 66 इतकी आहे.एकूण 6698 जणांची आत्तापर्यंत कोरोना चाचणी झाली असून त्यापैकी 6160 अहवाल प्राप्त झाले तर 538 प्रलंबित आहेत. एकूण 5493 निगेटिव्ह अहवाल आहेत तर 667 इतके पॉझिटिव्ह अहवाल आहेत.आजच्या दिवसात 270 अहवाल प्राप्त झाले आहेत .यापैकी 227 निगेटिव्ह तर 43 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 24 पुरूष 19 महिलांचा समावेश आहे. आज मृतांची संख्या 3 असून एकूण मृतांची संख्या 66 इतकी आहे. आत्तापर्यंत केगांव येथून 110 जणांना सोडण्यात आलंय तर हॉस्पिटलमधून 311 जण बरे होवून घरी परतले आहेत.आज ज्या व्यक्ती मृत पावल्या त्यात दक्षिण सदर बझार 60 वर्षीय महिला.भवानी पेठ 75 वर्षीय पुरूष. महेश नगर जुना विडी घरकूल परिसर 64 वर्षीय पुरूष.आज जे रूग्ण मिळाले त्यांचे विभागपुढील प्रमाणे - अशोेक चौक 1 पुरूष, 3 महिला...

पंढरपूर : पाच जण पॉझिटिव्ह आढळले; रुग्णांची संख्या आता सहा झाली

Image
पंढरपूर :   पाच जण पॉझिटिव्ह आढळले; रुग्णांची संख्या  आता सहा झाली पंढरपूर  : मुंबई येथून तालुक्‍यातील उपरी येथे आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज पुन्हा पंढरपूर शहरात दोन, गोपाळपूर, उपरी व करकंब येथे आलेले प्रत्येकी एक अशा पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या पाच पैकी चार व्यक्ती मुंबई तर करकंब येथील व्यक्ती पुणे येथून आलेली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आज सायंकाळी दिली.  पंढरपूर शहर आणि तालुका एवढे दिवस कोरोनामुक्त होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशानुसार कडेकोट अंमलबजावणी आणि उपाययोजना केल्या होत्या. अपवाद वगळता नागरिकांनी आदेशाचे पालन केले होते. त्यामुळे जिल्ह्यात काही भागांत कोरोना रुग्ण आढळले होते. परंतु, पंढरपूर शहर व तालुका मात्र कोरोनामुक्त होता.  दरम्यान, अन्य जिल्हा आणि राज्यातून पंढरपूर शहर आणि तालुक्‍यात शासनाची परवानगी घेऊन नागरिक परत येत आहेत. सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक नागरिक आतापर्यंत पंढरपूर शहर व ता...

जबरदस्त! सायन रुग्णालयातील एक महिन्याच्या बाळाची करोनावर मात

Image
जबरदस्त! सायन रुग्णालयातील एक महिन्याच्या बाळाची करोनावर मात करोनावर मात करणाऱ्या एक महिन्याच्या बाळाचं नर्स, डॉक्टरांकडून टाळ्या वाजवून कौतुक X राज्यात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असल्याने लोकांना चिंता सतावत असताना दुसरीकडे दिलासा देणाऱ्या काही घटनाही समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली असून सायन रुग्णालयात दाखल एक महिन्याच्या बाळाने करोनावर मात केली आहे. करोनावर मात केल्यानंतर बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून यावेळी नर्स, डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना टाळ्या बाजवून बाळ आणि त्याच्या आईला निरोप दिला. रुग्णालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत बाळाची आई त्याला कुशीत घेऊन वॉर्डमधून बाहेर येत असताना नर्स, डॉक्टर आणि कर्मचारी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे. करोनावर मात करणारं हे सर्वात लहान वयाचं बाळ ठरलं आहे. व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर नेटिझन्सदेखील सायन रुग्णालयातील डॉक्टर आणि इतरांचं कौतुक करत आहेत एप्रिल महिन्यात दोन महिन्यांच्या बाळाने करोनावर मात केली होती. २२ एप्रिल रोजी बाळाला त्याच्या तीन वर्षांची बहिण आणि आईसोबत सैफी ...

कर्नाटकातील धार्मिक स्थळं १ जूनपासून खुली होणार?;

Image
कर्नाटकातील धार्मिक स्थळं १ जूनपासून खुली होणार?; येडियुरप्पांनी मागितली पंतप्रधानांकडे परवानगी मंदिर, मशीद, चर्च आणि इतर धार्मिक स्थळ खुली करण्यासाठी पाठवलं पत्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा. (संग्रहित छायाचित्र) करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. सोशल डिस्टसिंग राखलं जावे म्हणून धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली होती. देशात लॉकडाउन लागू होऊन आता दोन महिने झाले आहेत. सरकारनं लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात अनेक बाबींना शिथिलता दिली असून, कर्नाटक सरकारनं धार्मिक स्थळ खुली करण्यासाठी पंतप्रधानांकडे परवानगी मागितली आहे. केंद्राकडून मंजूरी मिळाल्यास कर्नाटकात १ जूनपासून धार्मिक स्थळ खुली होणार आहेत. लॉकडाउनचा चौथा टप्पा संपल्यानंतर कर्नाटकात धार्मिळ स्थळे खुली करण्याची तयारी येडियुरप्पा सरकारनं सुरू केली आहे. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. कर्नाटकातील मंदिर, मशीद, चर्च आणि इतर धार्मिक स्थळ खुली करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. “धार्मिक स्थळं खुली करण्यापूर्वी...