रात्रीत आढळले सोलापुरात 74 पॉझिटिव्ह रुग्ण
रात्रीत आढळले सोलापुरात 74
पॉझिटिव्ह रुग्ण
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात 15 तासांमध्ये तब्बल नवीन 74 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत नव्याने आढळलेल्या 74 व्यक्तींमध्ये 60 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत 166 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 74 पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापुरात आतापर्यंत कोरोनामुळे 72 जणांचा मृत्यू झाला असून 321 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सहा हजार 594 व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून पाच हजार 772 एवढे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 822 झाली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापुरातील कोरोना आटोक्यात येणार कसा? हा प्रश्न सर्वांसमोर पडला असून सोलापूर शहरातील कोरोना आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊ लागला आहे. अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, सांगोला, पंढरपूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळू लागल्याने सोलापुरातील कोरोनाबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment