अक्कलकोट शहरात तीन,कुंभारीत दोन, सांगोल्यात एक कोरोना बाधित
अक्कलकोट शहरात तीन,कुंभारीत दोन, सांगोल्यात एक कोरोना बाधित
सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आज सकाळी नव्याने आढळलेल्या 42 कोरोना बाधित रुग्णांमध्ये अक्कलकोट शहरातील तीन, सांगोला तालुक्यातील निजामपूर येथील एक आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विडी घरकुल मधील दोन रुग्णांचा समावेश आहे.
दक्षिण सोलापूरच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या, अक्कलकोट शहरामध्ये आज नव्याने तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यापाऱ्यांच्या संपर्कातील हे तीन जण आहेत. कुंभारी मधील विडी घरकुल येथील दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असल्याची माहितीही प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिली. सांगोला तालुक्यातील निजामपूर गावातील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला असून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सांगोल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
Comments
Post a Comment