सोलापूर शहर व जिल्ह्यात42 कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, एकूण बाधित 709

सोलापूर शहर व जिल्ह्यात42 कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, एकूण बाधित 709


42 corona positive patients 15 hours in Solapur

सोलापूर :  आज गुरुवारी सकाळी 8 या 15 तासांमध्ये तब्बल 42 नवीन रुग्ण आढळले आहेत. या नवीन  रुग्णांमध्ये  17 पुरुष व 25 महिलांचा समावेश आहे. एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यूही आज सकाळी आठ वाजेपर्यंत झाला आहे.

कोरोनामुळे सोलापुरातील मृत पावलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 67 झाली आहे. सोलापुरातील सहा हजार 289 जणांची  आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 5,580 आले आहेत. 709 पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या 311 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही संख्या कधी आटोक्यात येणार? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. 12 एप्रिल पर्यंत कोरोना मुक्त असलेले सोलापूर अचानक कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस विभाग सोलापुरातील कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. दैनंदिन वाढत चाललेल्या रुग्णसंख्या संख्येमुळे सोलापूरमध्ये संभ्रमाचे व भितीचे वातावरण पसरले आहे

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब