पंढरपूर : पाच जण पॉझिटिव्ह आढळले; रुग्णांची संख्या आता सहा झाली
पंढरपूर : पाच जण पॉझिटिव्ह आढळले; रुग्णांची संख्या
आता सहा झाली
पंढरपूर : मुंबई येथून तालुक्यातील उपरी येथे आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज पुन्हा पंढरपूर शहरात दोन, गोपाळपूर, उपरी व करकंब येथे आलेले प्रत्येकी एक अशा पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या पाच पैकी चार व्यक्ती मुंबई तर करकंब येथील व्यक्ती पुणे येथून आलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आज सायंकाळी दिली.
पंढरपूर शहर आणि तालुका एवढे दिवस कोरोनामुक्त होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशानुसार कडेकोट अंमलबजावणी आणि उपाययोजना केल्या होत्या. अपवाद वगळता नागरिकांनी आदेशाचे पालन केले होते. त्यामुळे जिल्ह्यात काही भागांत कोरोना रुग्ण आढळले होते. परंतु, पंढरपूर शहर व तालुका मात्र कोरोनामुक्त होता.
दरम्यान, अन्य जिल्हा आणि राज्यातून पंढरपूर शहर आणि तालुक्यात शासनाची परवानगी घेऊन नागरिक परत येत आहेत. सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक नागरिक आतापर्यंत पंढरपूर शहर व तालुक्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथून तालुक्यातील उपरी येथे आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य काही व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
या सर्व नागरिकांचा रिपोर्ट काय येतो याकडे पंढरपूर शहर आणि तालुक्याचे लक्ष होते. मुंबई येथून पंढरपूर, गोपाळपूर आणि उपरी येथे तर पुणे येथून करकंब येथे आलेल्या एकूण तीन व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या तीन नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाल्यानंतर कोणत्या भागात तातडीने आवश्यक उपाययोजना करावयाच्या हे ठरविले जाणार आहे,
Comments
Post a Comment