सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला

 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एक 

कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला 



सोलापूर :
 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तत्पूर्वी, तो 20 मेपासून रजेवरच होता आणि निमोनिया झाल्याने त्याला केगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. मात्र, त्याच्यावर उपचार होत नसल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितल्यानंतर तेथील अधिकाऱ्याला तुरुंग अधीक्षकांनी लेखी पत्र दिले. 24 मे रोजी त्याला कुंभारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (ता. 27) त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार म्हणजे संशोधनाचा आहे, असे तुरुंग अधिक्षक डी. एस. इगवे म्हणाले.
जिल्हा कारागृहात काम करणारा तो कर्मचारी त्याच्या आईसोबत शासकीय क्वार्टरमध्ये राहतो. तर त्याची पत्नी व मुले पुण्यात आहेत. तो 22 तारखेपासून रजेवर होता. त्याला निमोनीया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला क्वारंटाईन करण्यात आले. त्या कर्मचार्‍यावर उपचार करावेत, असे पत्र दिल्यानंतर त्याला नेण्यात आले. यापूर्वीही जिल्हा कारागृहातील एका कैद्यास साधा ताप आल्याने त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच वार्डात दुसरे कोरोना संशयित रुग्णही ठेवण्यात आले होते. चार दिवसानंतर त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली, हाही प्रकार धक्कादायकच आहे, असेही इगवे म्हणाले. तो कर्मचारी सुट्टीवर असल्याने त्याचा तुरुंगातील कोणत्याही व्यक्तीशी संबंध आलेला नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब