जामगाव येथील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह
जामगाव येथील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह
सोलापूर : शुक्रवारी सकाळी सोलापूर प्रशासनाकडून स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला असून जामगाव येथील त्या वृद्धाच्या संपर्कातील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून सात अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
जामगाव (आ) (ता. बार्शी) येथे कोरोना बाधित रुग्णावर सोलापूर येथे उपचार सूरु असताना त्याचा मृत्यू झाला असून त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले तीन जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती तहसीलदार प्रदिप शेलार यांनी दिली
जामगाव येथील वृद्ध रुग्ण मुंबई येथून मूलीच्या घरी ता. 16 रोजी आला होता. त्याच्यावर गावातील एका बोगस डॉक्टरने उपचार करुन दोन सलाईन लावली होते. सर्दी, खोकला, ताप जाणवत असताना पुन्हा ता. 21 जुलाब व अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला होता. बार्शीतील तीन खासगी रुग्णालयात त्या वद्धाचा जावई घेऊन गेला. मात्र रुग्णालयांनी त्यांना दाखल करुन घेतले नाही. अखेर एका रिक्षाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टरांना त्या वृद्धामध्ये कोरोनाचा संशय येताच सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दरम्यान, प्रशासनाने रिक्षाचालकास क्वारंटाईन केले होते. वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताच जामगाव येथे सुमारे 50 जणांना प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखर्डे यांनी होमक्वारंटाईन, विलगीकरण कक्षात ठेवले होते व त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवले होते.
Comments
Post a Comment