मोहोळ शहरातील मास्क न वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
मोहोळ शहरातील मास्क न वापरणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

मोहोळ तालुका प्रतिनिधी: कोविड १९ च्या काळात मोहोळ शहरातील दुकानदार, फळ विक्रेते भाजीविक्रेते मास्क वापरत नसल्याने मोहोळ नगर परिषदेच्या पथकाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. गुरुवारी दिवसभर एकूण बत्तीस जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३४०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी २४ मे रोजी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्या साठी उपाययोजना करण्याचे आदेश मोहोळ नगर परिषदेला दिले होते. त्यानुसार मोहोळ नगरपरिषदेने पोलिस प्रशासनाच्या मदतीने एक पथक तयार केले होते. या पथकाने संपूर्ण शहरात पेट्रोलिंग केले असता दुकानदार, फळविक्रेते, भाजीविक्रेते असे एकूण ३२ लोक मास्क न वापरता विक्री करत असल्याचे आढळले. त्यामुळे सदर लोकांवर नगरपरिषदेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ३४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकामध्ये मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, अभियंता लोमटे खटके, योगेश डोके, माने, लेखापाल कांबळे फरीद इनामदार, अजित दानोळे, पोलीस नाईक अभिजित गाटे, आदलिंगे आदी सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी मास्क हॅन्ड ग्लोज चा वापर करावा तसेच ग्राहकांनी बाहेर पडताना तोंडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी एन के पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment