सोलापूरकर चिंतेत...गुरुवारी नवीन ८१ रुग्ण ; रुग्णांची संख्या एकूण ७४८ ;एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू



सोलापूरकर चिंतेत...गुरुवारी नवीन ८१ रुग्ण ; रुग्णांची संख्या एकूण ७४८

एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू  


Coronavirus Cases in India Country Registered 6566 New COVID-19 ...



सोलापूर (प्रतिनिधी)  : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाने एन्ट्री केल्यापासून सर्वाधिक 81 कोरोना बाधित रुग्ण आज एकाच दिवशी आढळले आहेत. आज आढळलेल्या 81 रुग्णामुळे सोलापुरातील एकूण रुग्णांची संख्या 748 झाली आहे. आज एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे सोलापुरात आत्तापर्यंत कोरोनाने  72 जणांचा बळी घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या सहा जणांना आज दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहे. बार्शी तालुक्यातील जामगाव परिसरातील 66 वर्षीय पुरुषाला 25 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले होते. 27 मे रोजी रात्री अकरा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जुना विडी घरकुल परिसरातील 61 वर्षीय महिलेला 24 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 27 मे रोजी उपचारा दरम्यान रात्री अकरा वाजता त्यांचे निधन झाले आहे. बेगम पेठ किडवाई चौक परिसरातील 57 वर्षीय महिलेला 26 मे रोजी सायंकाळी दुपारी चार वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 28 मे रोजी पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. शास्त्रीनगर परिसरातील 72 वर्षीय पुरुषाला 19 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 28 मे रोजी सकाळी 11 वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. भवानी पेठ परिसरातील 54 वर्षीय पुरुषाला 23 मे रोजी दुपारी बारा वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 28 मे रोजी दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाले आहे. रविवार पेठ परिसरातील 74 वर्षीय पुरुषाला 26 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 28 मे रोजी रात्री साडेबारा वाजता त्यांचे निधन झाले. आज नव्याने आढळलेल्या 81 रुग्णांमध्ये सोलापुरातील सब जेल परिसरातील दोन पुरुष, शास्त्रीनगर ताश्कंद चौकातील एक महिला, केशव नगर पोलिस लाईन मधील एक पुरुष, पाछा पेठेतील एक महिला, बाळीवेस उत्तर कसबा येथील एक महिला, किडवाई चौक बेगम पेठ येथील एक महिला, अशोक चौकातील एक पुरुष, बेगम पेठ येथील एक पुरुष, जुना विडी घरकुल येथील एक पुरुष व  दोन महिला, भूषण नगर येथील एक महिला, बुधवार पेठेतील एक पुरुष व एक महिला, सुनील नगर एमआयडीसी रोड परिसरातील दोन महिला, घोंगडे वस्ती भवानी पेठेतील एक महिला, संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड येथील एक पुरुष, रविवार पेठेतील दोन पुरुष, बेघर हाउसिंग सोसायटी विजापूर नाका येथील एक पुरुष, हनुमान नगर मधील एक महिला, नीलम नगर येथील दोन पुरुष व एक महिला,  डॉक्टर वसाहत मधील एक महिला, रेल्वे लाईन्स येथील एक महिला, न्यू विडी  घरकुल येथील एक पुरुष, कर्णिक नगर येथील दोन पुरुष व चार महिला, इंदिरानगर नगर येथील एक महिला, म्हेत्रे नगर एमआयडीसी येथील तीन महिला, न्यू बुधवार पेठ येथील दोन पुरुष व  तीन महिला, कल्पना नगर येथील एक महिला, दक्षिण सदर बझार येथील एक पुरुष, जुना पुना नाका येथील तीन पुरुष व चार महिला, एकता नगर येथील एक पुरुष, वसंत नगर पोलिस लाईन येथील एक पुरुष, शनिवार पेठेतील दोन महिला, मजरेवाडी येथील एक पुरुष व एक महिला, भवानी पेठेतील दोन पुरुष व दोन महिला, मडके वस्ती पुना नाका येथील पाच पुरुष व पाच महिला, कुमठा नाका येथील एक महिला, बादशा पेठेतील दोन पुरुष, विडी घरकुल येथील एक पुरुष व एक महिला,  सांगोला तालुक्यातील निजामपूर येथील एक पुरुष, अक्कलकोट मधील मधला मारुती येथील एक पुरुष, बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील एक पुरुष अशा 81 जणांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 656 अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब