महापालिका आरोग्य विभागास चार "खाट" भेट ; "श्रीमंतयोगी प्रतिष्ठान" ने जपली बांधिलकी



महापालिका आरोग्य विभागास चार "खाट" भेट

 

आपत्ती काळात "श्रीमंतयोगी प्रतिष्ठान" ने जपली बांधिलकी 




सोलापूर:  शहरात वरचेवर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे उपचारासाठी  दवाखान्यांमध्ये अनंत अडचणी आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासत महापालिका आरोग्य विभागास चार खाट भेट दिले आहेत.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेकडे अधिक साधन सामग्री असावी या प्रमुख उद्देशातून प्रतिष्ठाने महापालिका आरोग्य विभागास चार खाट भेट दिले आहेत. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महापालिकेचे उपायुक्त अजयसिंह पवार, जिल्हा परिषदेचे वित्त विभागाचे संचालक धनराज पांडे, राजधानी एक्सपोर्टचे राहुल चंडक, युसुफ मुंजावर, श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेस चार खाट प्रदान करण्यात आले.श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त या महामारीच्या पार्श्वभूमीवर चार खाट देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. यांचा आदर्श घेऊन समाजातील विविध घटकांनी वाढदिवस वर्धापन दिन व इतर निमित्ताने महापालिका आरोग्य विभागात आवश्यक असलेले खाट, गादी ऊशा व इतर साहित्य भेट म्हणून द्यावे असे आवाहन वित्त विभागाचे प्रमुख धनराज पांडे यांनी यावेळी केले. श्रीमंतयोगी प्रतिष्ठान हे गेल्या चार वर्षात समाजोपयोगी असेच कार्यक्रम घेतले. सर्वांसाठी प्रेरणादायी असे कार्य श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे असल्याचे गौरवोद्गार ही पांडे यांनी यावेळी काढले श्रीमंतयोगी प्रतिष्ठानने गेल्या चार वर्षात गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, बेघर निराधारांना अन्नधान्य वाटप करणे, माणुसकीची भिंत यासह विविध समाजोपयोगी असे उपक्रम घेतले आहेत. आणि आज जगाला हादरा देणाऱ्या कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभागास मदत गरजेची आहे म्हणून चार खाट दिले आहेत अशी भावना संस्थापक महेश कासट यांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर बंडगर, शुभम हंचाटे, यतिराज पवार,  प्रा.गणेश लेंगरे, राजेश क्षिरसागर, मयुर गवते, प्रशांत हिबारे, सतिश हक्के, सचिन हुडेकंरी, सुरेश लकडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब