…हे झालं नाही, तर मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल -उद्धव ठाकरे
…हे झालं नाही, तर मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल -उद्धव ठाकरे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वावरून राजकीय अस्थिरतेचं सावट सरकारवर फिरू लागलं आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचा ठराव दोन वेळा राज्यापालांकडे पाठवून सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला. “राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधीमंडळ नियुक्तीसंदर्भात मध्यस्थी केली नाही, तर मला राजीनामा द्यावा लागेल,” असा इशारा ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला. राज्यात करोनानं शिरकाव करत हातपाय पसरल्यानं मोठं संकट उभं राहिलं. करोनाचा धोका लक्षात घेता राज्यातील छोट्यामोठ्या कार्यक्रमासह निवडणूकाही रद्द करण्यात आल्या. यात जाहीर झालेली विधान परिषदेची निवडणूकही लांबणीवर गेल्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वाचा मुद्दा चर्चेत यायला स...