कोरोना संकट निवारण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये समन्वय अधिकारी नेमावा

कोरोना संकट निवारण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये समन्वय अधिकारी नेमावा

माजी आ.राजन पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे मागणी.

मोहोळ,(तालुका प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई पुण्यानंतर सोलापूर शहर व ग्रामीण मध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८१ झाली असून ती झपाट्याने वाढत आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा मोठ्या जोमाने कोरोना संकट निवारण्याचे काम करत असताना मुंबई- पुण्याच्या धर्तीवर या प्रशासनामध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय अधिकारी नेमण्याची मागणी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी फोनद्वारे अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नंतर सोलापूर जिल्हा व शहर मध्ये रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. सोलापुर जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त,पोलीस आयुक्त व पोलिस अधिक्षक, आरोग्य अधिकारी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे यांच्यामध्ये समन्वय राहावा व कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात यावी यासाठी पुणे शहरामध्ये ज्याप्रमाणे समन्वय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे ,त्याप्रमाणे सोलापुरातही जिल्ह्यातील अधिकाऱ्यां मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नेमणूक करण्याची मागणी माजी आ.राजन पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे फोन द्वारे आज केली.यावेळी बोलताना अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत म्हणाले की,सोलापूर जिल्ह्यातील माहिती घेऊन लवकरात लवकर स्वतंत्र बैठक लावून जिल्ह्याला समन्वय अधिकारी नेमण्याचे आश्वासन दिले.

Comments

Post a Comment


Popular posts from this blog

बार्शीत ठेकेदाराचा मृत्यू . तपास सीआयडी कडे . पुणे सीआयडी पथक बार्शीत दाखल .

पासपोर्ट धारकांनो काळजी घ्या; सायबर विभागानं केलं महत्वाचं आवाहन

पत्नी झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून