ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन;सलग दुसऱ्या दिवशी बॉलिवूड क्षेत्राला धक्का
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन
सलग दुसऱ्या दिवशी बॉलिवूड क्षेत्राला धक्का 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांचे आज निधन झाले. बॉलिवूडमधील दिग्गज राहिलेल्या ऋषी कपूर यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांना तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून लिहिले की, ते गेले...ऋषी कपूर गेले. त्यांचे नुकतंच निधन झालं आहे. मी तुटलो आहे.. कपूर फॅमिलीकडून ऋषी कपूर यांच्या मृत्यूच्या बातमीला रणधीर कपूर यांनी दुजोरा दिला आहे. ऋषी कपूर यांना बुधवारी त्यांच्या कुटुंबियांनी एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचा भाऊ रणधीर यांनी त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले होते. काल (ता.२९) बॉलिवुडने अभिनेता इरफान खानला गमावले. आता आज इरफानच्या निधनानंतर १ दिवसातच ऋषी कपूर यांनी निरोप घेतला. दोन दिग्गज कलाकारांना बॅक टू बॅक गमावणं चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे देशात शोककळा पसरली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावरील सेलेब्स आणि चाहते शोक करीत आहेत. ऋषी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले होते.
Comments
Post a Comment