सोलापुरात एका दिवसात सापडले १३ कोरोनाबाधित रुग्ण

सोलापुरात एका दिवसात सापडले १३ कोरोनाबाधित रुग्ण 

रुग्णांची एकूण संख्या ८१ झाली

चार पुरुष व नऊ महिलांचा समावेश
 117 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 104 जणांचे  निगेटिव्ह  13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले 
सोलापुरातील सदर बाजार लष्कर येथील तीन महिला, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील एक महिला, आंबेडकर नगर माऊली चौकातील एक महिला, शामानगर (बिग बाजार जवळ) येथील एक महिला, कुमठा नाका मार्कंडेय नगर येथील एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथिल तीन पुरुष, पाच्छा पेठ जवळील शनिवार पेठेत एक पुरुष, शास्त्रीनगरमधील एक महिला व एमआयडीसी रोडवरील ताई चौक येथील एका महिलेचा समावेश आहे. 

The Corona patients in Solapur is 81
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१ झाली आहे. आज एका दिवसात13 रुग्णांची भर पडली असून त्यामध्ये चार पुरुष व नऊ महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज नव्याने सापडलेल्या १३ रुग्णांमध्ये सोलापुरातील सदर बाजार लष्कर येथील तीन महिला, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील एक महिला, आंबेडकर नगर माऊली चौकातील एक महिला, शामानगर (बिग बाजार जवळ) येथील एक महिला, कुमठा नाका मार्कंडेय नगर येथील एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथिल तीन पुरुष, पाच्छा पेठ जवळील शनिवार पेठेत एक पुरुष, शास्त्रीनगरमधील एक महिला व एमआयडीसी रोडवरील ताई चौक येथील एका महिलेचा समावेश आहे. आज दिवसभरात 117 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 104 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ८१ असून त्यामध्ये 46 पुरुष व 35 महिला आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 75 बाधित रुग्ण दाखल असून त्यामध्ये 43 पुरुष व 32 महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आयसोलेशन वार्डातील सोळाशे 24 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी बाराशे 50 जणांची रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. 374 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित आहेत. अकराशे 69 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 81 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब