भारतात करोनाचे २४ तासात ७१ मृत्यू, रुग्णसंख्या ३२ हजारांच्याजवळ
भारतात करोनाचे नवे १८१३ रुग्ण, २४ तासात ७१ मृत्यू, रुग्णसंख्या ३२ हजारांच्याजवळ
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे

प्रतानिधिक फोटो
भारतात गेल्या २४ तासात करोनाचे १८१३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या ३१ हजार ७८७ इतकी झाली आहे. करोनामुळे २४ तासात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत भारतात करोनाची लागण होऊन १००८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ७ हजार ७९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
भारतात करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढते आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन वाढवण्यात यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘दो गज दूरी’ हे वाक्य उच्चारत सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व विशद केलं. ३ मे रोजी लॉकडाउनचा कालावधी संपतो आहे. अशात तो वाढणार की नाही हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि करोना टाळा असं आवाहन देशभरात करण्यात येतं आहे
Comments
Post a Comment