Posts

…हे झालं नाही, तर मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल -उद्धव ठाकरे

Image
…हे झालं नाही, तर मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल -उद्धव ठाकरे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वावरून राजकीय अस्थिरतेचं सावट सरकारवर फिरू लागलं आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याचा ठराव दोन वेळा राज्यापालांकडे पाठवून सुद्धा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला. “राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधीमंडळ नियुक्तीसंदर्भात मध्यस्थी केली नाही, तर मला राजीनामा द्यावा लागेल,” असा इशारा ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिला. राज्यात करोनानं शिरकाव करत हातपाय पसरल्यानं मोठं संकट उभं राहिलं. करोनाचा धोका लक्षात घेता राज्यातील छोट्यामोठ्या कार्यक्रमासह निवडणूकाही रद्द करण्यात आल्या. यात जाहीर झालेली विधान परिषदेची निवडणूकही लांबणीवर गेल्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यत्वाचा मुद्दा चर्चेत यायला स...

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन;सलग दुसऱ्या दिवशी बॉलिवूड क्षेत्राला धक्का

Image
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन सलग दुसऱ्या दिवशी बॉलिवूड क्षेत्राला धक्का  मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांचे आज निधन झाले. बॉलिवूडमधील दिग्गज राहिलेल्या ऋषी कपूर यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांना तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून लिहिले की, ते गेले...ऋषी कपूर गेले. त्यांचे नुकतंच निधन झालं आहे. मी तुटलो आहे.. कपूर फॅमिलीकडून ऋषी कपूर यांच्या मृत्यूच्या बातमीला रणधीर कपूर यांनी दुजोरा दिला आहे. ऋषी कपूर यांना बुधवारी त्यांच्या कुटुंबियांनी एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांचा भाऊ रणधीर यांनी त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले होते. काल (ता.२९) बॉलिवुडने अभिनेता इरफान खानला गमावले. आता आज इरफानच्या निधनानंतर १ दिवसातच ऋषी कपूर यांनी निरोप घेतला. दोन दिग्गज कलाकारांना बॅक टू बॅक गमावणं चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. ऋषी कपूर यां...

देशातील महाविद्यालयं कधी सुरू होणार? युजीसीने जाहीर केलं वेळापत्रक

Image
देशातील महाविद्यालयं कधी सुरू होणार? युजीसीने जाहीर केलं वेळापत्रक विद्यापीठ अनुदान आयोगाने या संदर्भातली माहिती दिली आहे. देशातील महाविद्यालयं उघडण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC ने दिली आहे. सध्या महाविद्यलयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयं ऑगस्टमध्ये सुरु होणार तर नव्या विद्यार्थ्यांसाठी ही महाविद्यालयं १ सप्टेंबरपासून सुरु होणार असं विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. अशात आता विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयं सुरु व्हायला ऑगस्ट महिना उजाडेल अशी माहिती दिली आहे. २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी १ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे. UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वेळापत्रकं दिली आहेत. एक २०१९-२० या वर्षासाठी आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद करण्यात आली. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्...

कोरोना संकट निवारण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये समन्वय अधिकारी नेमावा

Image
कोरोना संकट निवारण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये समन्वय अधिकारी नेमावा माजी आ.राजन पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे मागणी. मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):  महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई पुण्यानंतर सोलापूर शहर व ग्रामीण मध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८१ झाली असून ती झपाट्याने वाढत आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा मोठ्या जोमाने कोरोना संकट निवारण्याचे काम करत असताना मुंबई- पुण्याच्या धर्तीवर या प्रशासनामध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय अधिकारी नेमण्याची मागणी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी फोनद्वारे अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नंतर सोलापूर जिल्हा व शहर मध्ये रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. सोलापुर जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त,पोलीस आयुक्त व पोलिस अधिक्षक, आरोग्य अधिकारी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे यांच्यामध्ये समन्वय राहावा व कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात यावी यासाठी पुणे शहरामध्ये ज्याप्रमाणे समन्वय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे ,त्याप्रमाणे सोलापुरातही जिल्ह्यातील अधिकाऱ्यां मध्ये वरिष्ठ अधिका...

करोना: हार्मोन्समुळे महिला वाचवू शकतील पुरुषांचे प्राण!

Image
करोना: हार्मोन्समुळे महिला वाचवू शकतील पुरुषांचे प्राण! न्यूयॉर्क:  जगभरात करोनाचे थैमान सुरू आहे. करोनाच्या संसर्गामुळे जगभरात दोन लाख १७ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत महिलांची संख्या कमी आहे. महिलांच्या शरीरात असणाऱ्या सेक्स हार्मोन्समुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. लॉस एन्जेलिसमधील सेडार्स सिनाई मेडिकल सेंटरमधील डॉक्टर सारा घंदेरही यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, करोनाची बाधा झालेल्या जवळपास ७५ टक्के पुरुषांना उपचारासाठी आयसीयू अथवा व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. एका रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूंचे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. संशोधकांनुसार, एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स प्रजननासाठीच्या क्षमतेसाठी महत्त्वाचे आहे. एका संशोधनानुसार, हे दोन्ही हार्मोन्स महिलांमध्ये अधिक प्रमाणावर असतात. हे दोन्ही हार्मोन्स माणसांची रोगप्रतिकारक शक्ती आणि पेशींचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच ...

'ही' लक्षणे दिसल्यास करावी लागणार करोना चाचणी

Image
'ही' लक्षणे दिसल्यास करावी लागणार करोना चाचणी जगभरात करोनाचा कहर सुरू आहे. करोनाचा वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी आणि करोनाच्या आजारावर उपचार शोधण्यासाठी जगभरातील डॉक्टर, वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. मात्र, करोनाच्या विषाणूंचा मानवी शरिरावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला होत असल्याने संशोधकही चक्रावले आहेत. करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर आजाराची काही लक्षणे बाधितांमध्ये आढळत होती. आता मात्र, करोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी अनेकांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळत नसल्याचे समोर आले आहे. आता, ब्रिटनमधील आरोग्य विभागाने काही निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार करोनाच्या संसर्गाचे विक्राळ रुप समोर आले आहे. ही लक्षणे आतापर्यंत करोनाबाधितांपेक्षाही वेगळी आहेत. आजाराची ही लक्षणे अल्पवयीन, लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये आणखी चिंता व्यक्त केली जात आहे. 'ही' आहेत लक्षणे कोविड-१९ च्या थैमानामुळे ब्रिटनमधील आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. करोनाची बाधा झालेल्या काही मुलांमध्ये वेगळ्याच प्रकारची लक्षणे आढळली आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील करोनाबाध...

भारतात करोनाचे २४ तासात ७१ मृत्यू, रुग्णसंख्या ३२ हजारांच्याजवळ

Image
भारतात करोनाचे नवे १८१३ रुग्ण, २४ तासात ७१ मृत्यू, रुग्णसंख्या ३२ हजारांच्याजवळ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे प्रतानिधिक फोटो भारतात गेल्या २४ तासात करोनाचे १८१३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या ३१ हजार ७८७ इतकी झाली आहे. करोनामुळे २४ तासात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत भारतात करोनाची लागण होऊन १००८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ७ हजार ७९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढते आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन वाढवण्यात यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘दो गज दूरी’ हे वाक्य उच्चारत सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व विशद केलं. ३ मे रोजी लॉकडाउनचा कालावधी संपतो आहे. अशात तो वाढणार की नाही हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि करोना टाळा ...

सोलापुरात एका दिवसात सापडले १३ कोरोनाबाधित रुग्ण

Image
सोलापुरात एका दिवसात सापडले १३ कोरोनाबाधित रुग्ण  रुग्णांची एकूण संख्या ८१ झाली चार पुरुष व नऊ महिलांचा समावेश  117 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 104 जणांचे  निगेटिव्ह  13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले   सोलापुरातील सदर बाजार लष्कर येथील तीन महिला, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील एक महिला, आंबेडकर नगर माऊली चौकातील एक महिला, शामानगर (बिग बाजार जवळ) येथील एक महिला, कुमठा नाका मार्कंडेय नगर येथील एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथिल तीन पुरुष, पाच्छा पेठ जवळील शनिवार पेठेत एक पुरुष, शास्त्रीनगरमधील एक महिला व एमआयडीसी रोडवरील ताई चौक येथील एका महिलेचा समावेश आहे.  सोलापूर :  सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१ झाली आहे. आज एका दिवसात13 रुग्णांची भर पडली असून त्यामध्ये चार पुरुष व नऊ महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज नव्याने सापडलेल्या १३ रुग्णांमध्ये सोलापुरातील सदर बाजार लष्कर येथील तीन महिला, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील एक महिला, आंबेडकर नगर माऊली चौकातील एक महि...

आमदार राऊत यांचा रेड लाईट मध्ये मदतीचा हात

Image
आमदार राऊत यांचा रेड लाईट मध्ये मदतीचा हात बार्शी दि तालुका प्रतिनिधी     कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे, बार्शी शहरातील तेलगिरणी चौक येथील रेड लाईट एरियामधील महिला भगिनींची उपासमार होऊ नये म्हणून त्या महिला भगिनींना आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या वतीने अन्न-धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये ज्वारी 5 किलो, तांदूळ 1 किलो, तूर दाळ 1 किलो, साखर 1 किलो, खाद्यतेल 1 किलो,  1 अंगाचा साबण, 1 कपड्याचा साबण इत्यादी साहित्य देण्यात आले.

जिल्ह्यात सुरू झाले 67 कारखाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली माहिती

Image
जिल्ह्यात सुरू झाले 67 कारखाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली माहिती सोलापूर  : लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य शासनाने नगर परिषद आणि महानगर पालिकांच्या हद्दीबाहेरील कारखाने सुरू करण्याचा निर्णय  घेण्यात आला होता. त्यानुसार  सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत 67 कारखाने सुरु झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.  सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 171 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी  67 कारखाने सुरू झाले आहेत.  हे कारखाने औषधे, अन्नपदार्थ, अन्न आणि औषधी पदार्थ, पॅकेजिंग, सॅनिटाझर, खते, शेतीपूरक यंत्रसामग्री याचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.            सोलापूर जिल्ह्यात सुरू झालेल्या कारखान्यात काम करणारे कामगार ग्रामीण भागातील असल्याने, राज्य शासनाच्या सूचनेनुसार कामगारांची राहण्याची व्यवस्था ही कारखान्याच्या ठिकाणीच करावी किंवा कामगारांची बसमधून ने आण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  दिल्या आहेत.           ...

किम जोंग आजारीच, चालताही येत नसल्याचा दावा

Image
किम जोंग आजारीच, चालताही येत नसल्याचा दावा किम जोंग आजारीच, चालताही येत नसल्याचा दावा सेऊल:  उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष  किम जोंग  उन यांच्या प्रकृतीबाबतच्या चर्चांना अद्यापही पूर्ण विराम लागला नाही. उत्तर कोरियातून बंडखोरी करणारे उत्तर कोरियाचे माजी परराष्ट्रसंबंधविषयक मुत्सद्दी थाई योंग हो यांनी आणखी एक दावा केला आहे. किम जोंग यांची प्रकृती गंभीर असून त्यांना स्वत: च्या पायावर उभे राहता येत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. उत्तर कोरियाच्या 'पोलादी' भिंतीमुळे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत काहीही ठोस माहिती उपलब्ध होत नाही. उत्तर कोरियातील माध्यमांमध्ये ही ११ एप्रिल रोजी किम यांचे काढलेले छायाचित्र सोडले तर इतर कोणतीही माहिती अद्याप प्रकाशित केली नाही. दरम्यान, सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत थाई योंग हो यांनी सांगितले की, किम यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया झाली याची माहिती देता येणार नाही. मात्र, एक स्पष्ट आहे की, किम यांना स्वत: च्या पायावर उभे राहणे कठीण आहे. त्यांना उभे राहण्यासाठीदेखील इतरांच्या आधाराची आवश्यकता असून ...

“हे योग्य नाही, आपण मध्यस्थी करा”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन

Image
“हे योग्य नाही, आपण मध्यस्थी करा”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन राज्यात एकीकडे करोनाचं संकट उभं राहिलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवरुनही चर्चा रंगली आहे राज्यात एकीकडे करोनाचं संकट उभं राहिलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवरुनही चर्चा रंगली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापही निर्णय प्रलंबित ठेवला असल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती मिळत आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ‘करोनाचं संकट असताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होणं योग्य नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे,’ अशी माह...

करोनाबाधित गरोदर महिलेनं दिला बाळाला जन्म

Image
करोनाबाधित गरोदर महिलेनं दिला बाळाला जन्म करोनाबाधित गरोदर महिलेनं दिला बाळाला जन्म  आरोग्य यंत्रणेलाच 'व्हेंटिलेटर'वर आणून ठेवणाऱ्या करोना विषाणूचे तांडव नागपुरातही सुरू आहे. त्यामुळे येणारा क्षण कोणते संकट घेऊन येईल, याची धास्ती वाढत असतानाच, बुधवारी निसर्गाने एका महिलेच्या पदरात मातृत्वाचे दान टाकले. अगदी काही तासांपूर्वीच करोनाचं निदान झालेल्या गरोदर महिलेने बुधवारी पहाटे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रसुती विभागात एका गोंडस मुलीला जन्म दिला. एकीकडे करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना, भीतीच्या सावटाखाली असलेला 'मेयो'चा परिसर या चिमुकलीच्या टाहोंनी दणाणून गेला. परिस्थितीने कितीही संकटे समोर उभी केली तरी, जीवनात उमेदीचा अंकुर नव्याने फुलविण्यात निसर्गाची साखळी खंडीत होत नाही, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. मोमिनपुरा परिसरातील अन्सार नगरातील रहिवासी असलेल्या या २८ वर्षीय गरोदर महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्यानं मंगळवारी 'मेयो'त आणले गेले होते. मात्र ती रहात असलेला परिसर हा हायरिस्क झो...

अलविदा! अभिनेता इरफान खानवर मुंबईत अंत्यसंस्कार

Image
अलविदा! अभिनेता इरफान खानवर मुंबईत अंत्यसंस्कार अलविदा! अभिनेता इरफान खानवर मुंबईत अंत्यसंस्कार मुंबई-  बॉलिवूड अभिनेता  इरफान खान  यांच्या पार्थिवावर अंधेरीतील यारी रोड, वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील फार मोजकी मंडळी उपस्थित होती. मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात इरफान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाउनच्या परिस्थितीत फार कमी लोकांना इरफान यांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. चाहते, मीडिया आणि सिनेसृष्टीतील इतर कोणत्याही व्यक्तीला गर्दी करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली नाही. विशाल भारद्वाज, मिका सिंग, कपिल शर्मा असे मोजके सेलिब्रिटी अंत्यसंस्कारांवेळी उपस्थित होते. याशिवाय इरफान राहत असलेल्या इमारतीतील त्यांचे शेजारील काही उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानभूमीत कुटुंबातील फक्त पाचजणांना आत येण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी त्यांची दोन्ही मुलं बाबिल आणि अयान उपस्थित होते. इरफानचे सर्वात जवळचे मित्र दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया इरफान...

चीनने अमेरिकेच्या युद्धनौकेला पिटाळलं, सांगितलं घरी करोना व्हायरसवर द्या लक्ष

Image
चीनने अमेरिकेच्या युद्धनौकेला पिटाळलं, सांगितलं घरी करोना व्हायरसवर द्या लक्ष दक्षिण चीनच्या समुद्रात अमेरिका आणि चीनमधील संघर्ष वाढत चालला आहे. दक्षिण चीनच्या समुद्रात अमेरिका आणि चीनमधील संघर्ष वाढत चालला आहे. घुसखोरी करणाऱ्या अमेरिकन युद्धनौकेला बाहेर पिटाळून लावल्याचा दावा चीनने केला आहे. दक्षिण चीन सागरात मंगळवारी आमच्या नियंत्रणाखाली असलेल्या बेटाजवळ आलेल्या अमेरिकन युद्धनौकेला शोधून बाहेर काढण्यासाठी विमाने आणि जहाजे पाठवण्यात आली होती असे पीपल्स लिबरेशन ऑफ आर्मीकडून सांगण्यात आले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. ‘यूएसएस बॅरी’ ही गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर चिथावणीखोर कृती करुन, आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत होती. त्यामुळे घुसखोरी करणाऱ्या या युद्धनौकाला बाहेर काढण्यासाठी आम्हाला कारवाई करावी लागली असे पीएलएच्या दक्षिण कमांडने म्हटले आहे. पॅरासेल बेटाजवळ ही घटना घडली. चीनमध्ये हे शिशा बेट म्हणूनही ओळखले जाते. दक्षिण चीन समुद्रातील ३० पेक्षा जास्त बेटांवर चीनचे नियंत्रण आहे. पण तैवान आणि व्हिएतनामचा सुद्धा या बेटांवर दावा आहे. चीन संपूर्ण ...