Posts

गुरुवारी ५ नवे कोरोना बाधित, कोरोनाबाधितांची संख्या १७५४ वर

Image
गुरुवारी ५ नवे कोरोना बाधित, कोरोनाबाधितांची  संख्या १७५४ वर सोलापूर (प्रतिनिधी)  महापालिका हद्दीत गुरुवारी तब्बल पाच जणांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत कोरोनाबाधितांची  संख्या १७५४ वर पोचली आहे. तर आज १९ जण बरे होऊन परत गेले आहेत.  दोन जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे शहरातील एकाही रुग्णाचा अहवाल आता प्रलंबित राहिलेला नाही.शहरातील सत्तरफूट रस्ता, कुमठा नाका, न्यू पाच्छा पेठ, नवनाथ नगर आणि शासकीय रुग्णालयातील निवासस्थान या परिरिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.सोलापूर शहरात आता १७५४ कोरोना बाधितांची संख्या आहे. तर मृतांची संख्या १४५आहे. गुरुवारी एका दिवसात १७० अहवाल प्राप्त झाले. यात १६५निगेटिव्ह, ०५ पॉझिटिव्ह तर१९ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. गेल्या मंगळवारी फक्त 18 बाधित आढळल्याने दिलासा मिळाला होता, मात्र बुधवारी 77 जणांना लागण झाल्याने सोलापूर शहरवासियांना जोरदार धक्का बसला होता. आता गुरुवारी फक्त पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. 

महिलेच्या छातीत 30 तास घुसून राहिला चाकू, डॉक्टरांकडे नेलं आणि...

Image
महिलेच्या छातीत 30 तास घुसून राहिला चाकू, डॉक्टरांकडे नेलं आणि... कृष्णागिरी : महिलेच्या छातीमध्ये भोसकलेला धारधार चाकू डॉक्टरांनी 30 तासानंतर काढला आणि यानंतरही ती महिला जिवंत राहिली. ऐकायला जरी विचित्र वाटत असले, तरी ही घटना घडली आहे. तामिळनाडूमधील कृष्णागिरी जिल्हात ही घटना घडली. कोयंबटूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल याठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांची ही कमाल आहे. एका 40 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला झाला होता. यामध्ये सहा इंचाचा चाकू महिलेच्या छातीमध्ये भोसकण्यात आला. 30 तास हा चाकू  तसाच राहुनही महिलेचे प्राण वाचले आहेत. द हिंदू ने दिलेल्या माहितीनुसार कोयंबटूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या महिलेची सर्जरी केली. ही घटना घडल्यानंतर महिलेला तिच्या घरच्यांनी जवळच्या सरकारी कुमारमंगलम मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. रात्रभर ही महिला घरीच होती. त्यानंतर सकाळी तिला या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्यानंतर तिला कोयंबटोर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता तिला मेडिकल कॉलेज महाविद्यालयात आणण्यात आले. या महिलेवर एका ओळखीतील माणसानेच हल्ला ...

उपासमारीचा बळी! सलून व्यावसायिकाचा अखेर मृत्यू, 4 वर्षाच्या मुलासोबत घेतलं होतं विष

Image
उपासमारीचा बळी! सलून व्यावसायिकाचा अखेर मृत्यू, 4 वर्षाच्या मुलासोबत घेतलं होतं विष सांगली : कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. या उपासमारीने सांगली जिल्ह्यात एका सलून व्यावसायिकाचा बळी घेतला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावामधील विष प्राशन केलेल्या नवनाथ साळुंखे या सलून व्यावसायिकाचा अखेर गुरुवारी मृत्यू झाला. नवनाथ याने आर्थिक लॉकडाऊनला कंटाळून त्याचा 4 वर्षांच्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नवनाथसह त्याच्या मुलावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान नवनाथचा मृत्यू झाला. नवनाथच्या मुलाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सलून दुकाने बंद असल्याने उपासमारीला कंटाळून 10 जून रोजी नवनाथ याने आपल्या मुलासह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. इरळी येथील रहिवासी नवनाथ साळुंखे यांचा सलूनचा व्यवसाय होता. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असलेने नवनाथ आर्थिक अडचणीत सापडला होता. जगावं तरी कसं? कुटुंबाचं पोट भरावं कसं असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला होता. य...

भीषण! अखेर पुरावा आला समोर; चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारायला वापरले हे खिळ्यांचे रॉड

Image
भीषण! अखेर पुरावा आला समोर; चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारायला वापरले हे खिळ्यांचे रॉड नवी दिल्ली : चीन- भारत (India- China conflict) सीमेवर गलवान खोऱ्यात (Galwan Valley)  झालेल्या संघर्षात नेहमीच्या चकमकी होतात, तसा गोळीबार झालाच नव्हता, ही बाब आतापर्यंत समोर आलेली आहे. लडाखच्या पर्वतीय प्रदेशात चिनी सैनिकांनी अत्यंत अमानुषपणे भारतीय सैन्यावर हल्ला केला, हे आता समोर आलं आहे. चिनी सैन्याने भारतीय जवानांना मारण्यासाठी वापरलेल्या अणकुचीदार  खिळे लावलेल्या रॉडचा फोटो समोर आला आहे. भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. चिनी सैनिकांनी दगड आणि खिळे ठोकलेले रॉड यांसह भारतीय सैनिकांवर हल्ला केला. अनेक सैनिक जखमी झाले.  भारतानेही तीव्र प्रतिकार करत चीनचा हल्ला परतवून लावला. चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र चीनच्या बाजूने अद्यापही यावर अधिकृत काही माहिती जाहीर झालेली नाही. लडाख भागात...

खूशखबर! कोरोनोवर नवी उपचार पद्धत सापडली, एम्सच्या डॉक्टरांचा दावा

Image
खूशखबर! कोरोनोवर नवी उपचार पद्धत सापडली, एम्सच्या डॉक्टरांचा दावा   नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. लस तसेच अनेक प्रकारचे प्रयोग सुरु आहेत. प्लाझ्मा थेरेपी असो की आयुर्वेदिक पद्धतीनं औषधाचा शोध घेण्यात येत आहे. याच धर्तीवर राजधानी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (एम्स) रेडिएशन थेरपीच्या माध्यमातून कोरोनोचा संसर्ग रोखण्यासाठी नवा प्रयोग केला जात आहे. कोरोनाबाधित रुग्णामध्ये न्यूमोनियाचे परिणाम कमी करण्यासाठी सध्या रेडिएशन थेरपीच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे.एम्सच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आणि या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. डी.एन. शर्मा यांनी सांगितले की, ऑक्सिजनच्या आधारावर असलेल्या दोन कोरोना रुग्णांना रेडिएशन थेरपी देण्यात आली. हे दोन्ही रुग्ण 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांना यापूर्वी ऑक्सिजन आधार दिला जात होता, जो आता काढला गेला आहे. रेडिएशन थेरपीचा उच्च डोस सहसा कर्करोगाच्या उपचारांसाठी दिला जातो, परंतु या रुग्णांना कमी डोस रेडिएशन थेर...

सासू आणि पत्नीच्या गर्भातील अर्भकाचा खून केल्याप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा!

Image
सासू आणि पत्नीच्या गर्भातील अर्भकाचा खून केल्याप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा! जालना : पत्नीला नांदायला घेऊन जाण्याच्या वादातून सासू आणि पत्नीच्या गर्भातील आपल्या बाळाच्या खून केल्याप्रकरणी आरोपी पतीला जालना जिल्हा कोर्टानं फाशी, जन्मठेपे आणि 7 वर्षे तुरुंगवास अशी तिहेरी शिक्षा सुनावली. जालना जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. व्ही. पोतदार यानी ही शिक्षा सुनावली आहे. कृष्णा पवार असं या शिक्षा सुनावण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. गुन्हेगार अंबड तालुक्यातील यावल पिंपरी येथील रहिवासी आहे. काय आहे प्रकरण? कौटुंबिक वादातून कृष्णा पवार याची पत्नी ललिता माहेरी निघून गेली होती. पत्नीला नांदवण्याच्या कारणावरून पत्नी व सासरच्या मंडळीत वाद सुरू होता. दरम्यान, याच वादातून 5 वर्षांपूर्वी कृष्णा याने अंबड शहरात आपल्या गरोदर पत्नी व मावस सासूवर भरचौकात धारदार चाकूने वार केले होते. या घटनेत सासू सुमनाबाईचा आणि पत्नी ललिताच्या गर्भातील अर्भकाचा मृत्यू झाला होता. मावस सासू अलकाबाई गंभीररित्या जखमी झाली होती. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी दोन्...

चायनीज अँपमुळे कोणता आहे धोका, जाणून घ्या

Image
चायनीज  अँप मुळे कोणता आहे धोका, जाणून घ्या   भारता विरोधात चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. चिनी सैनिकांकडून करण्यात आलेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले आहे. त्यामुळे भारतात चीनविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. चिनी अॅप्स भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पण ते किती धोकादायक ठरु शकतील, याचा अंदाज अनेकांना नाही.   नवी दिल्लीः चिनी मोबाइल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपन्या या भारतात एक वाढत असलेले मार्केट आहे. TikTok पासून UC ब्राउझर पर्यंत आणि हेलो अॅप पर्यंत हे सर्व चायनीज अॅप्स भारतात खूप प्रसिद्ध आहेत. या अॅप्सचा वापर इतका भयानक सिद्ध होऊ शकतो की, तुम्ही त्याचा विचार करु शकत नाही. काही रिपोर्ट्सच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे की, चायनीज अॅप धोकादायक असतात. त्यांच्यामुळे काय नुकसान होऊ शकते, जाणून घ्या. गरज नसलेले अॅक्सेस मागितले जाते एका इनफॉर्मेशन सिक्योरिटी फर्मच्या स्टडीत म्हटले की, Helo, Shareit आणि UC ब्राउझर यासारख्या १० पैकी ६ प्रसिद्ध चायनीज अॅप्स युजर्संना कॅमेरा आणि मायक्रोफोनचा अॅक्सेस मागतात. परंतु, या अॅप्समध्ये या सारख्या अॅक्सेसचे कोणतेही काम नसते....

सुर्यग्रहणाचा गरोदर स्त्रियांवर खरंच परिणाम होतो का?

Image
सुर्यग्रहणाचा गरोदर स्त्रियांवर खरंच परिणाम होतो का?    सूर्यग्रहण म्हणजे निसर्गाचा आणि सृष्टीचा दुर्मिळ पण लक्षणीय असा सोहळा! २०२० या वर्षात दोनदा ग्रहण झाले असून आता २१ जून ला दिसणार आहे ते तिसरं ग्रहण आहे सूर्यग्रहण! या सूर्यग्रहणाची खास गोष्ट म्हणजे भारतात दिसणारं हे एकमेव सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असून २१ जून रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनिटे आणि ५८ सेकंदांनी सुरु होईल आणि दुपारी ३ वाजून ४ मिनिटे आणि १ सेकंदाने संपेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण एकूण ५ तास ४८ मिनिटे आणि ३ सेकंद दिसेल. तर सूर्यग्रहण हि एक नैसर्गिक घटना असली तरी बरेच जण असे मानतात की याचा मानवी जीवनाशी सबंध आहे आणि सूर्यग्रहणामुळे मानवी आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. खास करून गरोदर स्त्रीवर! म्हणून आज आम्ही या लेखातून घेऊन आलो आहोत काही गोष्टी ज्या गरोदर स्त्रीने सूर्यग्रहणा दरम्यान पाळाव्यात असे मानले जाते. गरोदर स्त्रिया आणि सूर्यग्रहण सूर्यग्रहणाच्या वेळेस गरोदर स्त्रीने खूप काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. या काळात त्यांच्यावर अनेक बंधने घातली जातात ज्याचा उद्देश असतो त्यांची आणि बाळा...

दिवे घाटामध्ये ४५ फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती

Image
दिवे घाटामध्ये ४५ फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती यंदा पायी पालखी सोहळा नसला तरी ही भव्य मूर्ती या मार्गाने जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. संग्रहित छायाचित्र पायी चालण्याची कसोटी पाहणारा अवघड वळणाचा दिवे घाट पार केल्यानंतरच विठ्ठलाचे दर्शन होणार आहे. दिवे घाट संपत आल्यावर पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होत असताना डावीकडे तब्बल ४५ फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आली आहे. यंदा पायी पालखी सोहळा नसला तरी ही भव्य मूर्ती या मार्गाने जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पुणे ते सासवड हा पल्ला सर्वात मोठय़ा अंतराचा आहे.  हडपसर येथील रहिवासी विजय कोल्हापुरे यांनी दिवे घाट संपताना डावीकडे असलेल्या हॉटेल परिसरातील जागेवर विठ्ठलाची भव्य मूर्ती उभी केली आहे. सागर भावसार यांनी ही मूर्ती घडविली आहे.

न्यायालयाचे कामकाज उद्यापासून फक्त सकाळच्या सत्रात

Image
न्यायालयाचे कामकाज उद्यापासून फक्त सकाळच्या सत्रात फक्त तातडीच्या प्रकरणांवर कामकाज पुणे :  शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज शुक्रवारपासून (१९ जून) सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन कार्यप्रणालीत काही दुरुस्ती केली आहे. त्यानुसार सत्र न्यायालयातील कामकाज फक्त सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. न्यायालयात फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील न्यायालयांचे कामकाज सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये सुरु ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील कामकाज ८ जूनपासून नियमित सुरू करण्यात आले होते. मात्र, शहरातील करोनाचा संसर्ग विचारात घेता न्यायालयीन कामकाज सकाळच्या सत्रात सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी ठेवण्यात येणार असली तरी सर्व प्रकारचे दावे दाखल करण्यास मुभा देण्यात आली आहे. शुक्रवारपासून न्यायालयाचे कामकाज सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पुढील कार्यवा...

पैशांच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून

Image
पैशांच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून शेजाऱ्यांनी त्यांच्या आवाजाकडे लक्ष दिले असते तर कदाचित ते वाचले असते पिंपरी-चिंचवडमध्ये मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दत्ता उर्फ राजेश सुनील पोलकम (वय-३८) याला अटक करण्यात आली असून सुनील मुतय्या पोलकम वय-६८ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा खून पैशांच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सुनील पोलकम यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी करण्यात आले त्यानंतर तोंड, हात आणि पाय बांधून त्यांचे खोलीमध्ये बंद करण्यात आले होते.  त्यामुळे काही तासांनी रक्तस्त्राव होऊन सुनील यांचा मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितले. तोंड बांधल्यानंतर ते आवाज करत होते. मात्र, बाहेरून कुलूप होते त्यामुळे आवाज येऊन ही शेजाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील मुतय्या पोलकम हे एकटेच दापोडी येथे राहात होते. ते एका नामांकित कंपनीत काम करत असल्याने त्यांना चांगली पेन्शनदेखील मिळायची. मृत सुनील यांनी दोन विवाह केले होते, यापैकी पहिल्या पत्नीला दोन मुली आणि एक मुलगा झाला होता. त्यानंतर त्या...

धक्कादायक : चार महिन्याच्या मुलीला झाडाखाली ठेवून आई सोडून गेली

Image
धक्कादायक : चार महिन्याच्या मुलीला झाडाखाली ठेवून आई सोडून गेली अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल पुण्यातील चांदणी चौकात चार महिन्याच्या मुलीला झाडाखाली ठेवून आई सोडून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोथरुड पोलिसांना या प्रकाराबद्दल माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत या मुलीला ताब्यात घेतलं आहे. कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणी चौक भागात लहान बाळाला झाडाखाली सोडून आई निघून गेल्याचं आम्हाला समजलं. माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहतच मुलीला ताब्यात घेतलं आहे. बाळाची प्रकृती सध्या चांगली असून तिला ससूनमधील एका संस्थेकडे सोपवण्यात आलं आहे. अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत आहेत.

करोनाबाधित २ रुग्ण घरातून पळाले

Image
करोनाबाधित २ रुग्ण घरातून पळाले सध्या पोलीस या महिलेचा तपास करत आहेत. संग्रहित छायाचित्र विरार :  वसई-विरारमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना तुळींज आणि वालीव परिसरातून घरीच अलगीकरणात असलेले २ करोनाबाधित रुग्ण पळाले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना ही तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतली आहे. नालासोपारा गाला नगर परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेस करोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर तिची खाजगी रुग्णालयात कोविड चाचणी केली. ती करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी महापालिका आरोग्य विभागाचे पथक तिच्या घरी गेले असता ही महिला घरातून पळून गेल्याचे आढळून आले. या प्रकरणी आरोग्य विभागाने तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या महिलेचा तपास करत आहेत. या महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसून ती या अगोदर अनेक वेळा घर सोडून गेल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दुसरी घटना ही वसई पूर्वेच्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतली आहे. वाकणपाडा परिसरातील एक इसम करोनाबाधित झाल्याने त्याच्या स...

यंदा पंढरीच्या वाटेवर असणार तिहेरी पोलीस बंदोबस्त

Image
यंदा पंढरीच्या वाटेवर असणार तिहेरी पोलीस बंदोबस्त सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली माहिती संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पंढरपुरातील आषाढी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. पायी दिंडी सोहळा न करता मानाच्या सात पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नियोजन केले असून, तिहेरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. तसेच, इतर भाविकांनी पंढरीत न येता आपल्या घरीच रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आषाढी एकादशी १ जुलै रोजी आहे. उन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता पायी पंढरीची वारी करण्याची  परंपरा वारकरी संप्रदायात आहे. मात्र यंदा करोना महामारीचे संकट देशावर घोंगावत आहे. त्यामुळे यंदा आषाढी वारी होणार का ? याची सर्वांना उत्सुक्ता होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेवून वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळी यांच्याशी चर्चा केली. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपानकाका, संत मु...

चीनशी आरपारचे युद्ध लढून धडा शिकवला पाहिजे – रामदास आठवले

Image
चीनशी आरपारचे युद्ध लढून धडा शिकवला पाहिजे – रामदास आठवले चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, आठवलेंचं आवाहन X संग्रहित चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे तसंच चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. याआधी रामदास आठवले यांनी चीनच्या सर्व प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. “चीन हा धोकेबाज देश आहे. धोका देऊन त्यांनी लडाखच्या गलवानमध्ये भारतीय सैन्यांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो. चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे तसंच चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी भारतीयांनी चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. व्यापार, उद्योग जगातला माझे नम्र निवेदन आहे की चीनमधून कोणत्याही प्रकारच्या सामुग्रीची आयात करू नका. चीन मधून मालाच्या आयातीवर बंदी आणावी,” असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. “लडाखच्या गलवान भागात भारतीय सैन्यावर चिनी ...

टीव्हीवर सतत सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीने घेतला गळफास

Image
टीव्हीवर सतत सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीने घेतला गळफास सुशांत सिंगच्या आत्महत्येचं वृत्त पाहून तरुणीने संपवलं जीवन टीव्हीवर सतत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाटणा येथे ही घटना घडली आहे. मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि निकालाची वाट पाहत होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, “दहावीची परीक्षा चागंली न गेल्याने ती तणावात होती. सुशांत सिंगने आत्महत्या केल्यानंतर ती वारंवार टीव्हीवर त्याच्या बातम्या पाहत होती. सोशल मीडियावरही त्याच्याबद्दलच सर्व व्हिडीओ पाहत होती. मी तिला वारंवार अशा बातम्या पाहू नको सांगत होती पण ती ऐकायला तयार नव्हती”. आई काही कामासाठी गच्चीवर गेली असता मुलीने बेडरुममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात धाव घेतली असंही त्यांनी सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपा...

लग्नामध्ये मिठाईवरुन राडा, नवरदेवाने नवरीच्या ९ वर्षीय भावाची केली हत्या

Image
लग्नामध्ये मिठाईवरुन राडा, नवरदेवाने नवरीच्या ९ वर्षीय भावाची केली हत्या वऱ्हाडी रात्री साडे आठ वाजता आल्यानंतर त्यांना नाश्ता आणि पाणी देण्यात आलं, पण... (प्रातिनिधिक छायाचित्र) लग्नसोहळ्यात मिठाई वाढण्यावरून राडा झाल्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या नवरदेवाने नवरीच्या ९ वर्षाच्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या भावाचं अपहरण करुन गाडीत बसवून पळून जात असताना नवरदेवाच्या गाडीने अन्य तीन महिलांनाही जोरदार धडक दिली. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अन्य दोघांना गंभीर जखमा झाल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अतसैनी पहाडपूर गावातील रहिवासी मनोज कुमार याची वारात गोविंदपुर अहदुल्लापुर गावात पोहोचली.  दिलेल्या वृत्तानुसार,नवरीचा दुसरा भाऊ पुनीतने (वय १९) सांगितलं की, “नवरदेवाची वारात साडे आठ वाजता आली. आल्यानंतर त्यांना नाश्ता आणि पाणी देण्यात आलं, पण मनोज आणि त्य...

सोलापुरात दमदार पाऊस; शेतांमध्ये साचले पाणी, शेतकरी सुखावला

Image
सोलापुरात दमदार पाऊस; शेतांमध्ये साचले पाणी, शेतकरी सुखावला मंगळवारी सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू होती. X सोलापूर : जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस बरसत आहे. सोलापूर  :   रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पुरेसा पाऊस सहसा होत नाही. परंतु यंदा काही वर्षानंतर प्रथमच रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागात शेतांमध्ये पावसाचे पाणी साचू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीकामांसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पाऊस विश्रांती घेत नसल्याने शेतात पेरणीसाठी शेतकरी वाफसा होण्याची वाट पाहात आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत असून गेल्या १५ दिवसांत सरासरी ५५.२९ मिमी प्रमाणे एकूण ६०८.१४ मिमी पाऊस पडला आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाची रिपरीप सुरू होती. शहरात व ग्रामीण भागात सर्वदूर पाऊस पडत होता. शहरात सकाळपासून ते सायंकाळपर्यंत १६ मिमी पाऊस पडला. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी आदी अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी येऊन वाढल्याने बांध ...

लॉकडाउनच्या काळात आता घरबसल्या होणार विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

Image
लॉकडाउनच्या काळात आता घरबसल्या होणार विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन वेबसाईटवरुन थेट दर्शनाची सोय उपलब्ध करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत. याचाच भाग म्हणून पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही दर्शनासाठी बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना विठठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घरबसल्या घेता येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी श्री विठ्ठल-राक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी बंद आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार सुरु आहेत. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाचा तसेच गुगल प्ले स्टोअरमधून shree vitthal rukmni live Darshan अॅप डाऊनलोड करावे. तसेच जिओ टीव्हीवरील जिओ दर्शन आणि टाटा स्कायवरील ॲक्टिव्ह चॅनेल या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार पाहता येणार आहेत. १ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा करोनाचे सावट असल्याने शासनाच्या निर्द...

वाढदिवशी कोयत्याने कापला केक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Image
वाढदिवशी कोयत्याने कापला केक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल पाच जणांना घेतले ताब्यात वाढदिवसाच्या दिवशी कोयत्याने केक कापून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणून बर्थडे बॉयसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कोयते आणि तलवारी असा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी पाच जणांना ताब्यातही घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी आदिल अस्लम शेख, शादाब अय्याज पालकर, मिजान निसार चौधरी, तौसिफ अजिज कलाल, शादाब अस्लम शेख, समीर अस्लम शेख (सर्वजण राहणार दस्तगीर कॉलनी, मंगळवार पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दस्तगीर कॉलनीतील या तरुणांकडून चार मोठे कोयते आणि एक तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेतले तर यांचा एक साथीदार फरार आहे. या सर्वांविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त साथीदारांसह सातारा येथील दस्तगीर कॉलनीमध्ये कोयत्याने केक कापून दहशत पासरविल्याची आणि तसे ...