टीव्हीवर सतत सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीने घेतला गळफास


टीव्हीवर सतत सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीने घेतला गळफास

सुशांत सिंगच्या आत्महत्येचं वृत्त पाहून तरुणीने संपवलं जीवन

टीव्हीवर सतत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पाटणा येथे ही घटना घडली आहे. मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि निकालाची वाट पाहत होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, “दहावीची परीक्षा चागंली न गेल्याने ती तणावात होती. सुशांत सिंगने आत्महत्या केल्यानंतर ती वारंवार टीव्हीवर त्याच्या बातम्या पाहत होती. सोशल मीडियावरही त्याच्याबद्दलच सर्व व्हिडीओ पाहत होती. मी तिला वारंवार अशा बातम्या पाहू नको सांगत होती पण ती ऐकायला तयार नव्हती”.

आई काही कामासाठी गच्चीवर गेली असता मुलीने बेडरुममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात धाव घेतली असंही त्यांनी सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब