वाढदिवशी कोयत्याने कापला केक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वाढदिवशी कोयत्याने कापला केक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


कोयत्याने केक कापणे पडले महागात ...



पाच जणांना घेतले ताब्यात


वाढदिवसाच्या दिवशी कोयत्याने केक कापून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणून बर्थडे बॉयसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कोयते आणि तलवारी असा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी पाच जणांना ताब्यातही घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी आदिल अस्लम शेख, शादाब अय्याज पालकर, मिजान निसार चौधरी, तौसिफ अजिज कलाल, शादाब अस्लम शेख, समीर अस्लम शेख (सर्वजण राहणार दस्तगीर कॉलनी, मंगळवार पेठ) यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, दस्तगीर कॉलनीतील या तरुणांकडून चार मोठे कोयते आणि एक तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेतले तर यांचा एक साथीदार फरार आहे. या सर्वांविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवसानिमित्त साथीदारांसह सातारा येथील दस्तगीर कॉलनीमध्ये कोयत्याने केक कापून दहशत पासरविल्याची आणि तसे फोटो समाजमाध्यमात प्रसिद्ध केल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी संबंधीत तरुणांचा शोध घेत ही कारवाई करण्यात आली आहे.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब