सासू आणि पत्नीच्या गर्भातील अर्भकाचा खून केल्याप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा!

सासू आणि पत्नीच्या गर्भातील अर्भकाचा खून केल्याप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा!

सासू आणि पत्नीच्या गर्भातील अर्भकाचा खून केल्याप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा!

जालना : पत्नीला नांदायला घेऊन जाण्याच्या वादातून सासू आणि पत्नीच्या गर्भातील आपल्या बाळाच्या खून केल्याप्रकरणी आरोपी पतीला जालना जिल्हा कोर्टानं फाशी, जन्मठेपे आणि 7 वर्षे तुरुंगवास अशी तिहेरी शिक्षा सुनावली. जालना जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. व्ही. पोतदार यानी ही शिक्षा सुनावली आहे.
कृष्णा पवार असं या शिक्षा सुनावण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. गुन्हेगार अंबड तालुक्यातील यावल पिंपरी येथील रहिवासी आहे.


काय आहे प्रकरण?

कौटुंबिक वादातून कृष्णा पवार याची पत्नी ललिता माहेरी निघून गेली होती. पत्नीला नांदवण्याच्या कारणावरून पत्नी व सासरच्या मंडळीत वाद सुरू होता. दरम्यान, याच वादातून 5 वर्षांपूर्वी कृष्णा याने अंबड शहरात आपल्या गरोदर पत्नी व मावस सासूवर भरचौकात धारदार चाकूने वार केले होते. या घटनेत सासू सुमनाबाईचा आणि पत्नी ललिताच्या गर्भातील अर्भकाचा मृत्यू झाला होता. मावस सासू अलकाबाई गंभीररित्या जखमी झाली होती. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकून जिल्हा सत्र न्यायालयातील पहिले न्यायाधीश एस. व्ही. पोतदार यांनी आरोपी कृष्णा पवार यास दोषी ठरवले होते.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब