धक्कादायक : चार महिन्याच्या मुलीला झाडाखाली ठेवून आई सोडून गेली
धक्कादायक : चार महिन्याच्या मुलीला झाडाखाली ठेवून आई सोडून गेली
अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील चांदणी चौकात चार महिन्याच्या मुलीला झाडाखाली ठेवून आई सोडून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोथरुड पोलिसांना या प्रकाराबद्दल माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत या मुलीला ताब्यात घेतलं आहे.
कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणी चौक भागात लहान बाळाला झाडाखाली सोडून आई निघून गेल्याचं आम्हाला समजलं. माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहतच मुलीला ताब्यात घेतलं आहे. बाळाची प्रकृती सध्या चांगली असून तिला ससूनमधील एका संस्थेकडे सोपवण्यात आलं आहे. अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस बाळाच्या आईचा शोध घेत आहेत.
Comments
Post a Comment