पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी नऊ जणांविरुध्द गुन्हा
पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी नऊ जणांविरुध्द गुन्हा सोलापूर (प्रतिनिधी) रस्त्यावर जमलेल्या लोकांना घरी जाण्यास सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यावर दगडफेक करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.ती घटना लष्कर परिसरातील नळबाजार भागात घडली.मुकेश किशनसिंग बोधीवाले (वय 35, रा. लोधी गल्ली) याच्यासह त्याची आई, मेव्हणा व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कर्मचारी मल्लू महादेव बिराजदार हे आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत पेट्रोलिंग करीत असताना लष्कर येथील मुर्गी नाला परिसरात रोडवर जमलेल्या लोकांना घरी जाण्यास सांगत होते.तेव्हा आरोपी मुकेश याने तुम मेरे को पहचानता नही, मै इधर का भाई हु,असे मनात रोडवर पडलेल्या फरशीच्या व दगडाच्या तुकड्याने मल्लू बिराजदार यांच्यावर फेकून मारून जखमी केले.तेव्हा इतर सहकारी पोलीस सोडविण्यासाठी आले असता त्यांच्याशी वादविवाद करून गच्ची पकडून शिवीगाळ केले.तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.तपास पोलिस नाईक पाटील हे करीत आहेत.