सोलापुरात रखवालदाराच्या मुलाकडून महिलेचा गळा दाबून खून
सोलापुरात रखवालदाराच्या मुलाकडून महिलेचा गळा दाबून खूनहोटगी रोड परिसरातील घटनामोबाईलमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यातअनैतिक संबंधातूनच खून झाल्याची चर्चा
सोलापूर (प्रतिनिधी) होटगी रोड परिसरातील एका अपार्टमेंटचा रखवालदार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने शेजारी बंगल्यात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली.ही घटना २७ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.या गुन्ह्यातील संशयित आरोपीला विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, होटगी रोड परिसरात मोहिते नगर भागात कैकशा अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंट शेजारी गंगाधर निवास नावाचा बंगला आहे. या बंगल्यात नागमणी नावाच्या महिला एकटाच राहत होत्या. तर बंगल्याच्या पाठीमागील बाजूस लागूनच पत्र्याचे शेड आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी राहण्यास आहे.२७ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपी सैफअली अशरफ शेख हा बंगल्याच्या पाठीमागील संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत आला. बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाजवळ तो काहीवेळ घुटमळत होता.त्याने पाठीमागील दरवाज्यावर थाप ही मारली,परंतु दरवाजा उघडला गेल्या नसल्याने, तो घराच्या मुख्य दरवाजातून आत गेला.यानंतर बंगल्यामध्ये राहणाऱ्या महिला नागमणी व आरोपी यांच्यामध्ये झटापट झाली.यातच आरोपी सैफअली याने महिलेचा गळा दाबून खून केला.
दरम्यान नागमणी यांचे भाऊ विजयकुमार गुरुपादय्या स्वामी ( वय-४९, रा. बाणेर, पुणे ) २९ जून रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत नागमणी यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते परंतु त्यांचे दोन्ही मोबाईल नंबर बंद लागत होते.यामुळे त्यांनी त्यांची मोठी बहीण यांच्याशी संपर्क करून नागमणी यांचा मोबाईल संपर्कात नसल्याचे सांगितले.यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला नागमणी यांच्या घराकडे पाठवून माहिती घेतली.त्यावेळी घराचा गेट बंद होते मात्र घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे त्या मुलास दिसून आले.त्याने घरात जाऊन पाहिले असता बेडरुमचा दरवाजा उघडा होता व आतल्या बाजूस नागमणी या जमिनीवर पडल्याचे दिसून आले.त्याने ही माहिती फिर्यादी विजय कुमार यांना दिली.फिर्यादी विजयकुमार यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्याची संपर्क करून बहीण संशयास्पद रित्या घरात पडल्याची माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळावरून नागमणी यांना उपचारार्थ दाखल केले असता उपचारापूर्वीच त्या मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी संशयित आरोपी सैफ अली शेख यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरामुळे खूनाच्या गुन्ह्याचा उलगडा.................
घटनेनंतर आरोपी सैफ अली याने सीसीटीव्ही चे बटन बंद केले होते.परंतु, घटनेपूर्वी च्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या.सीसीटीव्ही दिसणारा संशयित इसम सैफअली असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता पुढील प्रकार समोर आला.
तो आरोपी खून केल्यानंतर दुचाकीवरून थेट गुलबर्गा गाठले. याच बरोबर जाताना त्या महिलेचा मोबाईल सोबत घेऊन गेला.आणि त्यात स्वतःच्या मोबाईल मधील सिम कार्ड घातले.दरम्यान गुलबर्गा येथे पोहोचल्यानंतर आपण काही केलेच नाही या अर्विभावात निवांतपणे झोप घेत होता त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
मागील सहा महिन्यांपूर्वी नागमणी यांच्या आईचे निधन झाले.त्यानंतर त्या एकट्या त्या घरात राहण्यास होत्या. त्या घरात एकटाच राहत असल्याची संधी साधून संशयित आरोपी सैफअली याने नेमक्या कोणत्या उद्देशासाठी त्यांचा खून केला,याबाबतची माहिती पोलीस घेत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.
Comments
Post a Comment