युवतीने वडिलांचं गुप्तांग कापून केलं ठार, म्हणाली 'रात्री शांतपणे लागली झोप'
युवतीने वडिलांचं गुप्तांग कापून केलं ठार, म्हणाली 'रात्री शांतपणे लागली झोप'
बँकॉक : महिला बलात्काराच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे. एका 29 वर्षीय तरुणीने तिच्या वडिलांचे लिंग चाकूने कापल्याची घटना घडली आहे. महिला 10 वर्षांची असल्यापासून वडिल तिचं रोज लैंगिक शोषण करत होता. यालाच कंटाळून तरुणीने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे खरंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे.रोज होणाऱ्या त्रासाला वैतागून तरुणीने वडिलांचं गुप्तांग कापण्यासारखं एक भयानक पाऊललं. कित्येक वर्षांपासून ती या अत्याचाराने दु: खी होती अशी माहिती तिने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घराची झडती घेतली असता कचऱ्याच्या डब्यात रक्ताने माखलेला चाकू पोलिसांच्या हाती लागला. तर हा चाकू तरुणीनेच कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचं सीसीटीव्ही फूटेजदेखील पोलिसांच्या हाती लागलं आहे. या प्रकरणी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.
तरुणीने गुप्तांग कापल्यामुळे रक्तस्त्राव झाला आणि यात 58 वर्षांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या कपाळावरही महिलेने चाकूने वार केले होते आणि त्यांचं गुप्तांग कापलं होतं. स्थानिक पोलीस ठाण्यात जाताना या तरुणीने पत्रकारांना सांगितलं की, 'वडिलांच्या मृत्यूमुळे काल रात्री मी खूप शांतपणे झोपले आणि बाल वेश्या व्यवसायामध्ये असलेल्या सगळ्यांना हिच शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे' असंही तिने म्हटलं.
दरम्यान, या प्रकरणात काहीतरी संशयास्पद असल्याचा दावा बँकॉक पोलिसांनी केला आहे. पतीचा मृतदेह घेण्यासाठी आलेल्या तरुणीच्या आईने पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली. लहानपणापासून वडिलांनीच तरुणीचा सांभाळ केला असल्याचं तिच्या आईने सांगितलं. या सगळ्या घटनेवर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment