मोहोळ न्यायालयात शुक्रवारी कोरोनाने लावली हजेरी
मोहोळ न्यायालयात शुक्रवारी कोरोनाने लावली हजेरी...
सोलापूर शहरात राहणारे सरकारी बाबू मोहोळसाठी ठरताहेत कोरोना वाहक...

मोहोळ तालुका ( प्रतिनिधी ) मोहोळ शहर व तालुक्यात कोरणा रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी कोरोनाने मोहोळच्या न्यायालय देखील हजेरी लावली. मोहन न्यायालयात कार्यरत असणाऱ्या सोलापुरात वास्तव्यास असणाऱ्या एका लिपिकाचा अहवाल पॉझिटिव आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने न्यायालयातील पाच जणांना क्वॉरंटाईन केले आहे.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर मोहोळ शहर व तालुक्यात सर्वच शासकीय कार्यालयात गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. परिणामी तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मोहोळ शहर व तालुक्यात धोका कमी होण्याऐवजी आणखीन वाढतच चालला आहे. सोलापूर शहरात सध्या हजाराच्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत. सोलापूर शहरातील अनेक परिसर कन्टोनमेंट झोन घोषित केलेले आहेत. या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सरकारी बाबूंना प्रशासनाने सोलापुरातून नोकरीच्या ठिकाणी ये-जा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र सरकारी बाबूंना नोकरीच्या ठिकाणी राहणे पसंत नसल्याचे समोर आले आहे.
सोलापूर शहरातून अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी मोहोळ शहर व तालुक्यात नोकरीला आहेत. हे सरकारी बाबू दररोज सोलापूर शहर ते मोहोळ तालुका प्रवास करतात. सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्या बरोबर अनेकांचे मृत्यू देखील झाले आहेत. तरीदेखील हे लोक आपले वर्तन बदलायला तयार नाहीत. दरम्यान सोलापूर शहरात वास्तव्यास असणाऱ्या व मोहोळ न्यायालयात कार्यरत असणाऱ्या एका लिपिकाला कोरोना झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्या लिपिकाने न्यायालयात रजा टाकली होती. त्यापूर्वी तो न्यायाधीश आणि आपल्या अन्य सहकारी लिपिकांच्या व पक्षकारांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने न्यायालयातील पाच जणांना क्वॉरंटाईन केले आहे. तर न्यायालय परिसर सील करण्यात आला आहे.
सोलापूर शहरात राहणाऱ्या अन् मोहोळ तालुक्यात नोकरी करणाऱ्या सरकारी नोकरदारांनी कोरोना कालावधीत तरी मोहोळ मध्येच वास्तव्यास राहावे. त्यांची सोलापूरला होणारी ये-जा मोहोळ शहर व तालुक्यासाठी कोरोना वाहक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Post a Comment