पत्नी झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून

पत्नी झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून 


पत्नी झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले, बीडमधील धक्कादायक घटना

बीड : पती-पत्नीच्या शुल्लक भांडणाच्या रागातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा  धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील चकलांबा येथे उघडकीस आली आहे. यात पत्नी 40 टक्के भाजली असून तिच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पती व सासरच्या मंडळींनी झोपलेलं असताना पेट्रोल टाकून पेटवून दिले असं पीडिता संगीता खेडकर हिने सांगितलं आहे. घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवसांनी माहेरच्या मंडळीला सांगितलं की, रॉकेलच्या चिमणीचा अंगावर भडका झाल्याने पेट घेतला असं खोट सांगून पोलिसांमध्ये जाब दिला. माझ्या मुलीला जावई गणेश खेडकर व सासरच्या मंडळींनी पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप पीडित महिलेच्या वडिलांनी केला आहे.

पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रकार हा गंभीर आहे, सासरच्या मंडळीकडून सतत या पीडित महिलेला त्रास दिला जात होता. त्यामुळे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या वर गुन्हा दाखल करा,' अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्ये माऊली सिरसाट यांनी केली.

या प्रकरणात चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये संगीताच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यावर पोलिसांनी बोलण्यास नकार दिला.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब