धक्कादायक! राजधानी दिल्ली हाय अलर्टवर; दहशतवाद्यांकडून रचला जातोय हल्ल्याचा कट
धक्कादायक! राजधानी दिल्ली हाय अलर्टवर; दहशतवाद्यांकडून रचला जातोय हल्ल्याचा कट
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात राजधानी दिल्लीवर आणखी एक संकट घोंगावत आहे. दिल्ली राजधानीत दहशतवादी प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिसांना यासंदर्भात हाय अलर्ट लागू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी दिल्लीत घुसण्याचा प्लॅन करीत आहेत. बस, कार, टॅक्सीद्वारे जम्मू-काश्मीरमधील काही अतिरेकी राजधानीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. यानंतर काश्मीरमधील सर्व अतिथी गृह, हॉटेल्स, वाहनांचा तपास सुरू आहे. दिल्लीतील सर्व बसस्थानक, रेल्वे स्थानकांवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्ली आऊटर उत्तर जिल्ह्यातील भागात विशेष लक्ष ठेवण्यात सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील 4 ते 5 दहशतवादी ट्रकमध्ये बसून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ही माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. या इनपुटनंतर दिल्लीला हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे.मोठा दहशतवादी कट रचण्याच्या उद्देशाने दिल्लीत प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व जिल्हा डीसीपी, विशेष सेल गुन्हे शाखेची विशेष शाखा आणि दिल्लीच्या इतर घटकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
दुसरीकडे, दक्षिण काश्मीरमध्ये रविवारी सुरक्षा दलाने दोन वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. प्रथम सुरक्षा दलांनी शोपियां जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार केले. यानंतर श्रीनगरमधील जादिबल येथे शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाने केलेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले.
Comments
Post a Comment