सोलापुरात पुन्हा ९ जणांचा कोरोनाने मृत्यू ; कोरोनाबाधित संख्या १९३० वर
सोलापुरात पुन्हा ९ जणांचा कोरोनाने मृत्यू ; कोरोनाबाधित संख्या १९३० वर सोलापूर : जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करुनही सोलापुरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र पुन्हा पहायला मिळाले. रविवारी (ता. 21) शहरातील 70 वर्षांवरील सहा तर 58 वर्षांवरील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 222 अहवालात 39 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मृतांची संख्या कमी करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करुनही शहरातील मृतांची संख्या आता 170 वर पोहचली आहे. रविवारी या भागात सापडले 39 रुग्ण अवंतीनगर, भवानी पेठ, अवैद्यनगर हैदराबाद रोड, मोदी, रुपाभवानी मंदिराजवळ, जुना विडी घरकूल, बिलाल नगर, जुळे सोलापूर, माशाळ वस्ती, उपलप मंगल कर्यालयाजवळ, आनंद नगर, विजयपूर रोड, चंद्रकिरण अर्पाटमेंट, एम्पलॉयमेंट चौक, अशोक नगर, विजयपूर रोड, पद्मानगर, अक्कलकोट रोड, मनपा मुलांची शाळा क्र.4, उत्तर कसबा, टिळक चौक, नियर गणपती मंदिराजळव, उत्तर कसबा, सिध्देश्वर नगर, वसंतराव नाईक शाळेजवळ, उत्तर कसबा, तनिष्क रेसिडेन्सी, भवानी पेठ, स्वामी विवेकानंद नगर, दत्तर...