सोलापूर : हिवताप व किटकजन्य आजाराविषयी जनजागृती मोहीम
सोलापूर : हिवताप व किटकजन्य
आजाराविषयी जनजागृती मोहीम
सोलापूर ( प्रतिनिधी) : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून २०२० हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात येत आहे. या अनुषंगाने महिनाभरात हिवताप व इतर कीटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबर त्याच्या प्रतिरोध उपायांविषयी शहर तसेच ग्राम पातळीवर माहिती दिली जात आहे.
दरवर्षीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात मा डॉ एकनाथ बोधले, जिल्हा हिवताप अधिकारी पंढरपूर व आरोग्य अधिकारी म.न.पा. सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली जून-२०२० मध्ये ग्रामीण भागात व शहरात हिवताप व किटकजन्य आजरांबाबत जनजागृती करण्यासाठी हिवताप जनजागरण माहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारखे जीवघेणे आजार पसरतात.
हिवताप, डेंग्यु झाल्यास रुग्ण शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतो. तथापि, हिवताप, डेंग्यु सारख्या आजार पसरिविणा:या डासांचे नियंत्रण करणेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे. नागरी हिवताप योजना म न पा सोलापूर व जिल्हा हिवताप उप पथक कार्यालया सोलापूर तर्फे तसे आवाहन करण्यात येत आहे.
किटकजन्य आजारांवर प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होत असते. डास हा साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. 8 ते 10 दिवसांत नवीन डास जन्माला येतो. हास डास आजारी व्यक्तीला (रुग्ण) चावला की, रुग्णाच्या शरीरातील जंतू डासाच्या शरीरात जातात. तेथे त्यांची चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारखे आजार होतात.
आपल्याकडे प्रामुख्याने असलेल्या 3 प्रकारच्या डासांची माहिती पुढीलप्रमाणे. 1) ॲनॉफिलीस डास :- हा हिवतापाचा प्रसार करतो, त्यांची उत्पत्ती स्वच्छ पाणीसाठ्यांमध्ये होते. जसे की नदी, नाले, विहिरी, तळी.
2) क्यूलेस डास :- हा हत्तीरोगाचा प्रसार करतो, त्याची उत्पत्ती ही अस्वच्छ पाणीसाठयांमध्ये होते. जसे की शौचालयाच्या सेप्टीक टॅक, तुंबलेली गटारे, पाण्याचे डबके इ.
3) एडिस इजिप्तय डास :- हा डेंग्यु आणि चिकुनगुन्या या आजारांचा प्रसार करतो, त्याची उत्पत्ती ही घरगुती स्वच्छ पाणीसाठ्यांमध्ये होते, जसे की, पाण्याच्या टाक्या, बॅरल, रांजण, हौद, फुटके डबे, निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंट्यामध्ये साचलेले पावसाचे पाणी, घर आणि परिसरात साठलेले स्वच्छ पाणी ई. ठिकाणी होत असते.
किटकजन्य आजरांचा प्रसार रोखणे, स्वत:चा डासांपासून बचाव करण्यासाठी जनतेने पुढीलप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे. ताप आल्यास त्वरीत शासकीय दवाखान्यात जावे व डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आवश्यक चाचण्या कराव्यात. शासकीय रुग्णालयात यासाठी मोफत ओषधोपचार उपलब्ध आहेत.
झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत. डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, क्रिम, मॅट, कॉइलचा वापर करावा. घराच्या शौचालयाच्या सेप्टीक टॅंकच्या व्हेन्ट पाईपला (गॅस पाईप) जाळी अथवा कापड बांधावे. घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. सेप्टीक टॅंकचे झाकण सिलबंद ठेवावेत. गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे बसवावीत. घरातील पाण्याच्या टाक्या, रांजण, बॅरल, हौद हे आठवड्यातून किमान एकदा घासून पुसून स्वच्छ कोरडे व ते घट्ट झाकणाने आणि कापडाने नेहमी झाकून ठेवावेत. घरातील, गच्चीवरील, घराच्या परिसरातील भंगार सामान, फुटके डबे, वस्तू, निरुपयोगी टायर याची विल्हेवाट लावावी. या सामानात पावसाचे पाणी साचते व त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. घरातील कुलर, मनी प्लॉट मधील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलावे स्वच्छ करुन पुन्हा भरावे. फ्रिजचा ट्रेमधील पाणी वेळोवेळी काढून टाकावे. गच्चीवर, अंगणात, घराच्या परिसरात कोठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे आवाहन मा डॉ एकनाथ बोधले यांनी केले आहे. याप्रसंगी सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी श्री विजय बागल, आरोग्य सहाय्यक श्री कृष्णा घंटे, श्री ज्ञानेश्वर काटकर, श्री एस एम उमराणी, व आरोग्य कर्मचारी यांनी नियोजन केले आहे.
Comments
Post a Comment