सोलापूर मध्ये आज 84 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर
सोलापूर मध्ये आज 84 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; पाच जणांचा मृत्यू कोरोना बाधितसंख्या 949 वर पोहचली सोलापूर : सोलापुरात नव्याने 84 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 40 पुरुष,44 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला असून 88 वा बळी कोरोनाने घेतला आहे. आज 14 तर आतापर्यंत 394 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 949 वर पोहचली आहे. उर्वरित 467 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी दिली. आज 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये 3 पुरुष, 2 स्त्रीचा समावेश असून थोबडे वस्ती नीलम नगर, बुधवार पेठ , रविवार पेठ , घोंगडे वस्ती, भवानी पेठ निराळे वस्ती या परिसरातील रहिवासी आहेत. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज नव्याने आढळलेला रुग्णांपैकी शास्त्रीनगर 2, गुलाबाई चौक 4, राघवेंद्र नगर मुळेगाव रोड 7...