सोलापूर मध्ये आज 84 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर

सोलापूर मध्ये आज 84 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; पाच जणांचा मृत्यू 

कोरोना बाधितसंख्या 949 वर पोहचली


COVID19 FAQ What to do not to do dos donts safety precautions tips ...


सोलापूर :     सोलापुरात नव्याने 84 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 40  पुरुष,44 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाच दिवशी 5  जणांचा मृत्यू झाला असून 88 वा बळी कोरोनाने घेतला आहे.  आज 14 तर आतापर्यंत 394  व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 949 वर पोहचली आहे. उर्वरित  467 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांनी रविवारी दिली.
        आज 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये 3 पुरुष, 2  स्त्रीचा समावेश असून  थोबडे वस्ती नीलम नगर, बुधवार पेठ , रविवार पेठ , घोंगडे वस्ती, भवानी पेठ निराळे वस्ती या परिसरातील रहिवासी आहेत.  त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
            आज नव्याने आढळलेला रुग्णांपैकी शास्त्रीनगर 2, गुलाबाई चौक 4,  राघवेंद्र नगर मुळेगाव रोड 7, बुधवार पेठ 4, भारतरत्न इंदिरा नगर, रविवार पेठ, केशव नगर पोलीस वसाहत, झोपडपट्टी 2 विजापूर रोड, शिवाजी नगर बाळे 2,  शिवगंगा नगर शेळगी 2, निराळे वस्ती, इंदिरानगर, विनायक नगर, भवानी पेठ, बादशाहा पेठ, शिवगंगा नगर,जुळे सोलापुर, गीता नगर, न्यू बुधवार पेठ, आरटीओ ऑफिस, सोना नगर भवानी पेठ, सम्राट चौक, पुना नाका प्रत्येकी एक,  विडी घरकुल-५समाधान नगर-2, कुरबान हुसेन नगर 2, दक्षिण सदर बाजार 1, साखरपेठ 6,सलगर वस्ती 5, सात रस्ता परिसर 4, न्यू पाच्छा पेठ 1,नीलम नगर3 , बिग बाजार सात रस्ता 4, साईबाबा चौक 4, मधला मारुती अक्कलकोट 2, उत्कर्ष नगर अक्कलकोट 1,संजय नगर अक्कलकोट 1, जामगाव तालुका बार्शी.1, शेंद्री तालुका बार्शी 4, रातांजन तालुका बार्शी 1 आदी रुग्णांचा  समावेश आहे.
आज  एकूण 275 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 191 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 84 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  आतापर्यंत 949 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 535 पुरुष तर 414  स्त्री आहेत. 467 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 88  व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 394 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
"सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती"
होम क्वांरटाईन-     6631
-एकूण अहवाल प्राप्त : 7311
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 6362
-आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 949
उपचार सुरू- 467
बरे होऊन घरी गेले : 394
मृत- 88

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब