Posts

Showing posts with the label करोना

सोलापूर मध्ये आज 84 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर

Image
सोलापूर मध्ये आज 84 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर; पाच जणांचा मृत्यू  कोरोना बाधितसंख्या 949 वर पोहचली सोलापूर :     सोलापुरात नव्याने 84 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 40  पुरुष,44 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाच दिवशी 5  जणांचा मृत्यू झाला असून 88 वा बळी कोरोनाने घेतला आहे.  आज 14 तर आतापर्यंत 394  व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 949 वर पोहचली आहे. उर्वरित  467 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांनी रविवारी दिली.         आज 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये 3 पुरुष, 2  स्त्रीचा समावेश असून  थोबडे वस्ती नीलम नगर, बुधवार पेठ , रविवार पेठ , घोंगडे वस्ती, भवानी पेठ निराळे वस्ती या परिसरातील रहिवासी आहेत.  त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.             आज नव्याने आढळलेला रुग्णांपैकी शास्त्रीनगर 2, गुलाबाई चौक 4,  राघवेंद्र नगर मुळेगाव रोड 7...

मुंबई-पुणे भागात लॉकडाउनमधल्या सवलती रद्द-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
मुंबई-पुणे भागात लॉकडाउनमधल्या सवलती रद्द-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय करोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाउन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाउन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता. लॉकडाउन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई महानगरआणि पुणे महानगर क्षेत्रासाठी ती लागू असेल.म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू राहील. ...