रुग्णालयांचा अ‍ॅडमिट करुन घेण्यास नकार, गर्भवती महिलेचा रिक्षामध्ये मृत्यू

 रुग्णालयांचा अ‍ॅडमिट करुन घेण्यास नकार, गर्भवती महिलेचा रिक्षामध्ये मृत्यू

वैद्यकीय दुर्लक्षाचे हे अत्यंत धक्कादायक प्रकरण


महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक दुर्देवी घटना घडली. वैद्यकीय दुर्लक्षाचे हे अत्यंत धक्कादायक प्रकरण आहे. एका २६ वर्षीय गर्भवती महिलेला रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे या महिलेचा ऑटोरिक्षामध्येच मृत्यू झाला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

गर्भवती महिलेला अ‍ॅडमिट करुन घेण्यास नकार देणाऱ्या तीन रुग्णालयांविरोधात मुंब्रा पोलिसांनी एफआयआर दाखल करुन तपास सुरु केला आहे. २५ मे च्या रात्री ही दुर्देवी घटना घडली. मरण पावलेल्या २६ वर्षीय गर्भवती महिलेला रात्री अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या. तिचे कुटुंबीय तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेले.

पण वेगवेगळया रुग्णालयांनी तिला अ‍ॅडमिट करुन घेण्यास नकार दिला. ती आणि तिचे कुटुंबीय वेगवेगळया रुग्णालयांमध्ये फिरत होते. पण कोणीही त्या महिलेला दाखल करुन घेतले नाही. प्रसुती वेदनांनी कळवळत असताना ऑटोरिक्षामध्येच या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तीन रुग्णालयांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब