उद्योग व्यवसाय बाबतीत सोमवारी बैठक
उद्योग व्यवसाय बाबतीत सोमवारी बैठक
आमदार राऊत यांची माहिती
बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) : लॉक डाऊन काळात काही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत मात्र उद्योजकांमध्ये काही संभ्रम निर्माण झाले या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि अधिकारी यांची सोमवारी दुपारी साडेबारा वाजता बाजार समितीत बैठक आयोजित करावी अशी मागणी आमदार राऊत यांनी केली आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या बैठकीला तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि पांगरी वैराग बार्शी पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत यामध्ये प्रामुख्याने शेतीमाल खरेदीविक्री,आणि वाहतूक, फळे भाजीपाला लिलाव आणि शहरातील वीटभट्टी उद्योगाबाबतीत चर्चा होण्याची शक्यता आहे
काय गॅरेज कामाविषयी चर्चा होईल का
ReplyDeleteकाय गॅरेज कामाविषयी चर्चा होईल का
ReplyDelete