मोहोळ च्या टिकटॉक स्टार जोडप्याला रमेश बारसकर यांनी केली मदत
मोहोळ च्या टिकटॉक स्टार जोडप्याला रमेश बारसकर यांनी केली मदत
आभाराचा व्हिडिओ टिकटॉक वर झाला व्हायरल
मोहोळ,(तालुका प्रतिनिधी): कोरोनामुळे जगभरामध्ये सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली असून अश्यातच ज्यांचे हातावरील पोट आहे अश्या कुटुंबाचा उदरनिर्वाह साधन बंद झाले आहेत.मोहोळ शहरातील सुप्रसिद्ध टिकटॉक स्टार असलेले जोडपे गणेश शिंदे व योगिता शिंदे यांना आर्थिक टंचाईच्या पाश्वभूमीवर मोहोळ चे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्य देऊन त्यांच्या आर्थिक कोंडीत सहकार्य केले आहे.शिंदे जोडप्यानीही भावनिक टिकटॉक व्हिडीओ द्वारे बारसकर यांचे आभार व्यक्त केले.मोहोळ येथील रेल्वे स्टेशन येथे राहणारे गणेश शिंदे व योगिता शिंदे हे पती पत्नी आपल्या कॉमेडी व्हिडीओ मुळे टिकटॉक या सोशल ॲप वर प्रसिद्ध आहेत. मात्र काम करण्याची धमक असूनसुद्धा सध्याच्या परिस्थितीमूळे हाताला काम मिळत नाही, त्यामूळे जगणं कठीण होऊन बसले आहे,या निराशे मधून त्यांनी असं वाटतंय की आत्महत्या करावी. पण लहान मुलगी व बायकोकडे बघून तो विचार मनातून काढून टाकतो.अशा आशयाचा व्हिडीओ टिकटॉक वर टाकला होता.तो व्हिडीओ क्षमा बारसकर यांनी बघताक्षणी मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना दाखवला आणि ते सुद्धा तो व्हिडीओ पाहून अस्वस्थ झाले.आपण काही तरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी शिलवंत क्षीरसागर, जितेंद्र अष्टूळ, प्रकाश सोनवणे, आलिम शेख यांना सोबतीला घेऊन थेट गणेशच्या घरी जाऊन दोन महिने पुरेल इतका किराणा माल त्याला देऊ केला.टिकटॉकवर केलेल्या साध्या व्हिडीओची दखल घेऊन रमेश बारसकर यांनी मदत केल्या बदल डोळ्यातून अश्रू गाळत अतिशय भावनिक असा आभाराचा व्हिडीओ गणेश शिंदे यांनी अपलोड केला आहे.त्या व्हिडीओ ला ही लाखो व्ह्यूज आणि लाईक्स प्राप्त झाल्या आहेत.
Comments
Post a Comment