देशभरात ४ हजार १२३ नवे करोना रुग्ण, संख्या ६७ हजारांच्याही वर



देशभरात ४ हजार १२३ नवे करोना रुग्ण, संख्या ६७ हजारांच्याही वर

चोवीस तासात देशभरात १५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशभरात ४ हजार १२३ नवे करोना रुग्ण मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. त्यामुळे देशभरात करोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. दरम्यान मागील चोवीस तासात देशभरात १५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत देशभरात २० हजार ९१७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४४ हजार २९ जणांवर उपचार सुरु आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ३१.१५ टक्क्यांवर पोहचलं आहे असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

Comments

Post a Comment


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

धक्कादायक! सोलापुरात कर्जबाजारी बारचालकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या