मोहोळ शहरात तीन दिवसांचा कर्फ्यू - मुख्याधिकारी पाटील
मोहोळ शहरात तीन दिवसांचा कर्फ्यू - मुख्याधिकारी पाटील
१३ ते १५ मे दरम्यान शहरात राहणार कडकडीत बंद...

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील पाटकुल, सावळेश्वर आणि ढोकबाभूळगाव येथे कोरोना रुग्ण सापडल्याने नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तालुक्यातील नागरिकांचा शहराशी येणारा संपर्क लक्षात घेता सर्वांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नगरसेवकांच्या चर्चेतुन १३ ते १५ मे दरम्यान शहरात कर्फ्यू होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी एन.के. पाटील यांनी दिली.
संपुर्ण जगाला हैराण करून सोडलेल्या कोरोनाचा संसर्गाचे रूग्ण संख्या वरचेवर वाढत असून त्याचे लोन मोहोळ तालुक्यात पोहोचले आहे. मोहोळ तालुक्यात आतापर्यंत सापडलेले रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील अनेक लोक अत्यावश्यक सुविधा घेण्यासाठी मोहोळ शहरात येत आहेत. त्यामुळे शहराला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. या धर्तीवर मोहोळ नगरपरिषद कार्यालय सोशल डिस्टन्स ठेवत मुख्याधिकारी एन.के पाटील, प्रभारी नगराध्यक्ष हाजी शौकतभाई तलफदार यांनी सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोहोळ शहराच्या हितासाठी १३ ते १५ मे दरम्यान कडकडीत बंद पाहण्याचे ठरले आहे.
या बंद दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता शहरातील कोणतेही दुकाने उघडली जाणार नाहीत. ३ दिवसाच्या संपुर्ण मोहोळ शहर बंद नंतर शहरामध्ये येणारे उपरस्ते बंद केले जाणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन्ही गेट मधुन जाणे-येणे ची सोय करण्यात येणार आहे. तसेच बंद कालावधीत सकाळी ७ ते ९ या वेळेत किरकोळ व ठोक दुध विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात इतर गावच्या नागरिकांनी मेडिकल व दवाखाना सोडून अन्य कारणास्तव शहरात प्रवेश केल्यास सबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
शहरातील व्यापारी अथवा नागरिक खरेदीसाठी किंवा अन्य कारणासाठी सोलापूर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी गेलेले निर्दशनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मोहोळ शहरात येणार्या प्रत्येक वाहनांची व वाहन चालकांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे मोहोळ शहर व तालुक्यातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील मुख्याधिकार्यांनी केले आहे.
याेग्य निर्णय, पण थाेडी उशीर झाला.
ReplyDelete