सोलापुरात मंगळवारी १३ नव्या रूग्णांची भर; एकाचा मृत्यू
सोलापुरात ६२१ करोनाग्रस्त तर मृतांची संख्या ५९ वर
सोलापुरात मंगळवारी १३ नव्या रूग्णांची भर; एकाचा मृत्यू

सोलापूर (प्रतिनिधी) सोलापुरात आज सकाळी आठ वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार करोनाबाधित १३ नव्या रूग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ५९ झाली आहे. तर एकूण रूग्णसंख्याही ६२१ वर पोहोचली आहे. आज सकाळी १०५ चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात चार महिलांसह १३ जणांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले. एकूण रूग्णसंख्येमध्ये ३४४ पुरूष आणि २७७ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये ३७ पुरूष व २२ महिला आहेत. मात्र आतापर्यंत २७७ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.आतापर्यंत आढळून आलेले रूग्ण प्रामुख्याने शहरातील असून झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत. तर ग्रामीण भागात करोनाचा फैलाव सुदैवाने न झाल्यामुळे तेथील रूग्णसंख्या १२ पर्यंतच मर्यादित राहिली आहे. ५९ मृतांमध्ये चार मृत ग्रामीण भागातील आहेत. अक्कलकोट, मोहोळ, सांगोला आणि उत्तर सोलापूर तालुका अशा तीन भागातील प्रत्येकी एक हे चौघे मृत आहेत. एकमेकांच्या थेट संपर्कात आल्यामुळेच रूग्णसंख्या वाढत आहे. त्याच बरोबर ‘सारी’ची वाढती लागण हेदेखील पोषक ठरली आहे.
सारी कडे प्रशासन दुर्लक्ष करतो आहे असं वाटत आहे
ReplyDelete