राज्यांतर्गत मोफत एसटी प्रवास सेवा रद्द
राज्यांतर्गत मोफत एसटी प्रवास सेवा रद्द
एसटी महामंडळाकडून सोमवारपासून सुरू के ले जाणारे ऑनलाइन पोर्टलही रद्द करण्यात आले आहे.
संग्रहित छायाचित्र
मुंबई : राज्यांर्तगत आणि परराज्यातून राज्यात येऊ इच्छिणाऱ्या व जाणाऱ्या मजूर, कामगार, विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. परंतु, २४ तासांच्या आत मदत व पुनर्वसन विभागाने यात बदल के ला आहे.
केवळ राज्यात विविध ठिकाणी अडकलेले मजूर व नागरिकांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत घेऊन जाणे आणि महाराष्ट्रातील मजूर व अन्य रहिवासी जे इतर राज्यांत अडकले आहेत त्यांना महाराष्ट्राची सीमा ते जिल्ह्य़ांर्तगत प्रवास मोफत असेल, असे स्पष्ट केले आहे. या आदेशानंतर अन्य प्रवाशांसाठी असलेली राज्यांर्तगत एसटी सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे परिवहन विभाग, एसटी महामंडळ आणि मदत व पुनर्वसन विभागात समन्वयाचा अभाव असल्याचेच दिसून आले.
९ मेपासून मोफत प्रवासाची सोय देण्याचा निर्णय झाला. यासाठी २२ प्रवाशांचा गट असणे गरजेचे होते. त्यांची यादी पोलीस ठाण्यात तर गावात खोळंबलेल्यांनी जिल्हाधिकारी किं वा तहसीलदारांकडे सोपवण्यास सांगितले होते. शनिवारी परिवहन विभागाने केलेल्या घोषणेनंतर शासन निर्णय जारी करण्यात आला. परंतु त्यानंतरही रात्री मदत व पुनर्वसन विभागाने दुसरा आदेश काढून मोफत प्रवासाच्या निर्णयात बदल केले. एसटी महामंडळाकडून सोमवारपासून सुरू के ले जाणारे ऑनलाइन पोर्टलही रद्द करण्यात आले आहे.
नव्या आदेशात काय?
परप्रांतीय मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत आणि इतर राज्यांतून जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत, त्यांना त्यांच्या जिल्ह्य़ात सोडण्यासाठीच एसटीची मोफत बस सेवा उपलब्ध असणार आहे. जुन्या आदेशाची अंमलबजावणी होणार नसल्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितले.
Nice I liked it.
ReplyDeleteCheck my blog also
Mr. Information
From Mr. Media