सोलापुरात 9 तासात २१ रुग्ण:कोरोना बाधितांची संख्या आता 456 वर

 सोलापुरात 9 तासात २१ रुग्ण:कोरोना बाधितांची संख्या आता 456 वर

सोलापूर शहराबरोबरच आता कोरोना आपले पाय ग्रामीण भागातही पसरु लागला आहे. सोलापूर शहराच्या जवळ असलेल्या तळे हिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) व पाचेगाव (ता. सांगोला) येथे नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता 456 वर पोचली आहे.
21 patients of Corona found in 12 hours in Solapur
सोलापूर :  21 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 12 पुरुष व नऊ स्त्रियांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एका व्यक्तींचा आज मृत्यू झाला आहे.  ही व्यक्ती 65 वषार्ची असून ती बुधवार पेठ परिसरात राहते.सोलापूर शहराबरोबरच आता कोरोना आपले पाय ग्रामीण भागातही पसरु लागला आहे. सोलापूर शहराच्या जवळ असलेल्या तळे हिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) व पाचेगाव (ता. सांगोला) येथे नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता 456 वर पोचली आहे. 
आज एकूण 194 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 173 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्या व्यक्तीला 15 मे ला सारीच्या उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान 18 मे ला रात्री सव्वा नऊ वाजता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या मयत झालेल्या व्यक्तीमुळे आता मयताची संख्या 30 इतकी झाली आहे. आज तीन जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या 168 इतकी झाली आहे. त्यामध्ये 102 पुरुष व 66 स्त्रियांचा समावेश आहे. रुग्णालयात 258 जण उपचार घेत आहेत.
आज आढळलेले रुग्ण हे कुमारस्वामी नगर, शास्त्रीनगर, भैय्या चाैक, तेलंगी पाच्छा पेठ, लोटस अपाटर्मेंट गीतानगर, पाच्छा पेठ, लक्ष्मी चाैक जुनी विडी घरकुल, कोनापुरे चाळ, म्हेत्रेनगर, सदिच्छानगर विजापूर रोड, कुमठा नाका, दत्तनगर, दाजीपेठ, बुधवारपेठ, संजयनगर, रामवाडी, संजय गांधी नगर रामवाडी, अरविंद धाम पोलिस वसाहत, पाचेगाव (ता. सांगोला), तळे हिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) या ठिकाणचे आहेत. 
कोरोना मीटर
आजपयर्ंत होमक्वारंटाइन झालेले रुग्ण-12854
होम क्वारंटाईन पूणर् झालेले-6311
अद्याप क्वारंटाईन असलेले व्यक्ती-6543
इन्टीट्युशनल क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-4589
अद्याप इस्टीट्युशनल क्वारंटाइन असलेले-1349
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती-4743
एकूण प्राप्त तपासणी अहवाल-4612
प्रलंबित अहवाल-131
निगेटिव्ह अहवाल -4156
पाॅझिटिव्ह अहवाल -456
एकूण मृत्यू-30 

Comments

Post a Comment


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

धक्कादायक! सोलापुरात कर्जबाजारी बारचालकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या