सोलापुरात शुक्रवारी 28 रुग्णांची भर ; बाधितांची संख्या 516 वर तीन पुरुषांचा मृत्यू झाला

सोलापुरात शुक्रवारी  28  रुग्णांची भर ;
 बाधितांची संख्या 516 वर
 तीन पुरुषांचा मृत्यू झाला



सोलापूर : शुक्रवारी सकाळी   आलेल्या अहवालात  28 रुग्ण वाढले तर  तीन पुरुषांचा मृत्यू झाला आहे तर बरे झालेल्यांची संख्या एकूण 218 आहे. सोलापुरात आज शुक्रवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ‘कोरोना’ संसर्ग प्राप्त झालेले अहवाल 108 असून त्यापैकी निगेटिव्ह अहवाल 80 आहेत आज 28 पॉझिटिव्ह अहवाल मिळालेले आहेत. यामध्ये 14 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश होतो. एकूण रुग्ण संख्या 516 झाली आहे.आज सकाळी एकूण 108 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 28 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 80 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
  4 हजार 605 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 37 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 218 असल्याची माहितीही दिली.सोलापूर शहर व जिल्ह्यातील 5 हजार 122 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Comments

  1. हे रुग्ण कुठल्या परिसरातील आहेत ते पण देत जावा plz

    ReplyDelete

Post a Comment


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

धक्कादायक! सोलापुरात कर्जबाजारी बारचालकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या